शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?; अंबादास दानवे म्हणाले, आमदारांना केवळ…
Ambadas Danve on Cabinet expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच इतर राजकीय घडामोडींवरही भाष्य केलंय. वाचा...
लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात चर्चा होतेय ती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची… आता लवकरच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जातील तर काही आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय. या सरकारमध्ये आता कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. हे आता केवळ आमदारांना लॉलीपॉप दाखवत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार केल्यावर सरकारला जास्त प्रॉब्लेम निर्माण होतील, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
बोर्डाच्या जमिनी सरकार दरबारी करू माझं तर असा आरोप आहे आणि विशेषता गृहमंत्र्यावर ज्या गरिमांच्या प्रॉपर्टी आहेत निर्वाचितांच्या प्रॉपर्टी आहेत. त्या सुद्धा सरकार स्वार्थ हेतूने विकायचा सपाटा लावला आहे आणि विकलेले आहेत. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा जमिनी विकल्या आहेत. चारशे पार कशासाठी पाहिजे तर हे हळूहळू समोर येत आहे. म्हणजेच घटना बदलण्यासाठी पाहिजे होतं आणि भाजप असेच सांगत आहे. विरोधकांनी नॅरोटीव्ह सेट केला. ही सत्यता टी राजासिंह यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय, असंही दानवे म्हणाले.
आरक्षण प्रश्नावर प्रतिक्रिया
प्रकाश अण्णा शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे. परंतु सरकारने ज्या ज्या गोष्टीचे आश्वासन दिले आहे, ते केले पाहिजे, असंही अंबादास दानवे म्हणाले.
सांगलीच्या लढतीवर भाष्य
सांगलीच्या लोकसभेच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या तिघांमध्ये झालेली तिरंगी लढत विशाल पाटलांनी जिंकली. यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आता निवडणूक झाली आहे. विशाल पाटील जिंकलेले आहेत. त्यांनी हा आनंद जनतेच्या कामासाठी खर्च घातला तर बरे होईल. आता जे झाले त्याच्यावर चर्चा करणे हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.