मनोज जरांगे यांची सरकारने फसवणूक केलीय; दानवेंचा गंभीर आरोप
Ambadas Danve on Manoj Jarange Patil and Maratha Reservation : मनोज जरांगेच्या आंदोलनावरून दावनेंची शिंदे सरकारवर टीका... म्हणाले सरकार जरांगेंची फसवणूक करतंय. आमचा दौरा प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आहे, असंही जरांगे म्हणालेत. वाचा सविस्तर...
दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 22 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केलेली आहे. याच्या आधीही मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळात मग ते का रिजेक्ट झालं ठीक आहे. आम्ही सर्वांनी मिळून ते मंजूर केलं कारण कोणी विरोध करणार हा विषय नव्हता. आरक्षण टिकेल की नाही हा संभ्रम अजूनही समाजाच्या मनात आहे. जरांगे पाटलांचा आंदोलन ही त्यांची भूमिका वेगळी आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनावर म्हणाले…
जरांगे पाटलांच्या आंदोलनाची भूमिका समजून घेऊन तारखांवर तारखा दिल्या. नोटिफिकेशन काढण्याचं ठेवलं. या नोटिफिकेशनच कायद्यात रूपांतर कधी होणार? हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे. स्पष्टीकरण कोणीच करत नाही. त्यामुळे आथा हे आंदोलन मोठं होत जाईल असं मला वाटतं, असं म्हणत अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय.
मनसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
राज ठाकरे यांनी अनेक वेळा लोकसभेचे निवडणूक लढले आहे. मागच्या वेळेस नाही का लावा रे तो व्हिडिओ मला वाटतं काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला होता. त्यांनी लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात खूप मोठा परिवर्तन होईल असं मला वाटत नाही, असं म्हणत निवडणुका आणि मनसेची भूमिका यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली.
महायुतीच्या जागा वाटपावर भाष्य
भाजपच्या मागे शिंदे गटाला यांच्यातून गद्दारी करून गेलेली आहे यांना फरफट जावं लागणार आहे. जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या त्यांना घ्यावे लागणार आहे. जोडी भाकर दिली. भाजपने तेवढीच खायची असं त्यांचा हाल होणार आहे. त्यासाठी 12 जागा त्याही मिळाला तरी खूप झालं असं मला वाटतं. 12 मिळतील का नाही ती पण माझ्या मनात शंका आहे. त्यांची उमेदवार भाजपकडून उभे राहण्याचे तयारीत आहे, असं म्हणत महायुतीतील जागा वाटपावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली.