अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

Ambadas Danve on BJP Shivsena Eknath Shinde Group Leders Phone : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू; अंबादास दानवे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष... छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन...; दानवेंची भूमिका काय?
अंबादास दानवे
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 3:46 PM

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. चंद्रकांत खैरेदेखील छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढण्यास इच्छूक आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटात याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे दानवे नाराज असल्याची चर्चा होत आहे. आता दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. अंबादास दानवे यांना फोडून संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्यावर अंबादास दानवे यांचं मत काय? अंबादास दानवे काय म्हणाले?

दानवेंना फोडण्याचा प्रयत्न

भाजप आणि शिंदे गटाकडून अंबादास दानवे यांना फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे गट, भाजपच्या प्रयत्नाला वैतागून अंबादास दानवे यांनी फोन बंद केले आहेत. फोन बंद करून अंबादास दानवे यांचे गाठीभेटी दौरा सुरूच आहेत. आपण शिंदे गट किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

दानवेंची भूमिका काय?

आज सकाळीही पत्रकार परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हाते म्हणत असतील की त्यांच्या पक्षात येणार आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो की, मी जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मी सुस्पष्टपणे सांगत आहे. जे म्हणतात जाणार त्यांना विचारणा करा… हे त्यांचं अपयश आहे. इथे त्यांना उमेदवार भेटत नाही. विशेषतः भाजपचं… ही त्यांची हार आहे, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

आज यादी जाहीर होईल त्याच माझं नाव असणे आणि नसणे हे महत्वाचे नाही. गद्दार राजकारण संपर्क होतो. माझ्या मनात तसूभरही काही नाही . ज्याला तिकीट मिळाले त्याच काम करेल, असं आजच सकाळी बोलताना अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर म्हणाले…

प्रकाश आंबेडकर अजूनही आमच्यासोबत यावेत अशी त्यांची भावना आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेतून फटका कोणाला बसतो हे त्यात परिस्थितीत अवलंबून असते. कोणत्या उमेदवार उभा असतो. त्यावर अवलंबून असते. मनोज जरांगे अपक्ष उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतील असे मला वाटत नाही. कायदेशीर मला माहिती नाही. सब्जेक्ट टू कंडीशन दिलंय त्यांना काही चिन्ह बहाल केलेला नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरही दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय. अटल बिहारी वापेयीजींनी सभा घेतली होती. धनगडचं धनगर केले जाईल, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी अटलजींनी दिलेलं आणि फडणवीसांनी दिलेला आश्वासन पूर्ण झालेले नाही, असं दानवेंनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...