मला राजकीय भविष्याची, आमदारकी- मंत्रिपदाची पर्वा नाही!; ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळांचा पुन्हा एल्गार
Chhagan Bhujbal on OBC Reservation and Maratha Andolan : मनोज जरांगे यांचा अभ्यास कमी!; छगन भुजबळ पुन्हा मनोज जरांगे पाटलांवर बरसले. आपल्याला राजकीय भवितव्याची चिंता नसल्याचंही छगन भुजबळांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 13 जानेवारी 2024 : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी आपल्याला राजकीय भविष्याची चिंता नसल्याचं म्हटलं आहे. ओबीसी मेळाव्याला जे विरोध करत असतील. ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त सपोर्ट करत असेल त्यांचं देखील ओबीसी जास्त नुकसान करू शकतात. मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाहीये. मला आमदारकीची पर्वा नाही. मला माझ्या मंत्री पदाची पर्वा नाही. राजकीयभविष्याची पर्वा नाही ज्यांना परवा असेल ते विचार करत असतील. मला हौस आहे म्हणून मी राजकीय नुकसान करून करून घ्यायला तयार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
“आम्ही बराच काळ लढतोय”
बीडमध्ये जाळपोळ झाली. लोकांच्या घरांवर आणि हॉटेलवर जाळपोळ झाली. लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले. घरातील लोकांची, बायका-मुलांचे जीव धोक्यात घातले. पोलीस हतबल झाली पोलिसांच्या गाड्या अडवल्या. चळवळीला रौद्ररूप धारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसी आरक्षण देखील वर्ष दोन वर्षात मिळालेलं नाही. नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते आणि आम्हाला अजूनही लढावं लागत आहे, भुजबळांनी म्हटलं आहे.
बीडचे दौरे वाढले?
एवढ्यात छगन भुजबळ यांचे बीड जिल्ह्यातील दौऱ्या वाढण्याची चर्चा होते. मनोज जरांगे यांनीही अनेकदा भुजबळांवर टीका केली. याला आज छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. या बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. मी जास्त दौरे करतोय असं म्हणणं योग्य नाही. मी या आधीही बीडमध्ये आलो आहे. मागच्यावेळी नेत्यांच्या घरांवर हल्ले झाले. जाळपोळ झाली. तेव्हा मी आलो होतो, माझ्या दौऱ्याच्या विषयी मनोज जरांगे यांचं ज्ञान कमी आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.
देशाच्या संपत्तीवर फक्त ठराविक लोकांचा अधिकार आहे का ? सगळ्यांचा अधिकार आहे. एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा. मग व्यक्ती असेल,पुढारी असेल किंवा पक्ष असेल. राजकीय नेते OBC साठी काय निर्णय घेतात. याकडे सर्व समाजाचे लक्ष, कुणावर अन्याय करतात. हे सुद्धा सामान्य उभी श्रेष्ठ होत आहे. पक्ष चालवायचे आहे त्यामुळे नीट विचार करा, असंही भुजबळांनी म्हटलं.