मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये; भरभराटीची कहाणी सांगितली

CM Eknath Shinde on Marathwada Muktisangram Din : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये; भरभराटीची कहाणी सांगितली
एकनाथ शिंदेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 11:45 AM

आज 76 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण छत्रपतीसंभाजीनगरमधील सिद्धार्थ मैदानावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार भागवत कराड, खासदार कल्याण काळे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्याच्या भरभराटीची कहाणी सांगितली.

मराठवाडाच्या ‘समृद्धी’वर भाष्य

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो,सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करून मराठवाड्याच्या समोर लागणार दुष्काळग्रस्त हा शब्द दूर करायचं आहे. मराठवाडा ग्रीडला आम्ही पुन्हा चालना दिली आहे. नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग आमच्या काळात पूर्ण झालं. किर्लोस्कर- टाटासारख्या मोठ्या कंपनी मराठवाड्यात आल्या आहेत, असं शिंदेंनी म्हटलं.

लाडकी बहिण योजना, प्रशिक्षण योजना यामुळे फायदा होत आहे. अन्नपूर्णा योजना दिल्या. पीकविमा दिलं. शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. मराठवाड्यातील अनेक कारखाण्याशी आपण एम. ओ. यू साईन करतोय. एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग आणि कल्याणकारी योजनेची सांगड घालण्याचा प्रयत्न आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात पैशे पोहोचले आहेत, असं त्यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमाला डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित आहेत. त्यांना उद्देशून एकनाथ शिंदे यांनी भाषणात मुद्दा मांडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो… उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संवाद साधण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. गणपती उत्सव सगळीकडे सुरू आहे आणि आज त्यांचा निरोप समारंभ आहे. जी भूमिका त्यांची असते. तिच तुमची आहे तुम्ही देखील असते. विघ्नहर्ता आहात. रुग्णांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याच काम तुम्ही करत असतात. समृध्दी महामार्ग आहे आहे इतर काही योजना असेल ते देखील आम्ही करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे उद्योग येत आहेत. विविध योजना आपण जनतेसाठी आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली आहे. त्याचं प्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी आपण योजना आहेत. मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो. दोन अडीच वर्षांपूर्वी देखील मी सर्जरी केली आहे, अशी मिश्किल टिप्पणीही एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.