उद्धव ठाकरे बालिश!, त्यांना…; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धवजी, तुम्ही नरेंद्र मोदीसाहेबांची बरोबरी करू नका!; कुणी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा? शिंदे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना काय म्हटलं? उद्धव ठाकरे यांच्या कोणत्या कृतीवर आणि विधानावर आक्षेप घेण्यात आला? पाहा...

उद्धव ठाकरे बालिश!, त्यांना...; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 2:58 PM

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, संभाजीनगर | 13 जानेवारी 2024 : मुंबईतील न्हावा शेवा सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या उद्घाटनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो का नव्हता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेजी, तुम्ही नरेंद्र मोदीसाहेबांची बरोबरी करू नका!, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

शिरसाटांचा ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे यांचा चष्मा अशाच अँगलकडे जातो. नको तिथे पाहायची त्यांना सवयच लागली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी देखील त्यांनी अशीच टीका केली होती. अशा बारीक गोष्टी मुद्दाम शोधायच्या आणि अटलजी चा फोटो का नव्हता? अटलजीचे नातेवाईक का नव्हते? हा उद्धव ठाकरे यांचा बालिशपणा आहे. बालिशपणा हाच शब्द त्यांना लागू होतो, असं संजय शिरसाट म्हणालेत.

“मोदींची बरोबरी करू नका”

उद्धव ठाकरे यांनी आज बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कालाराम मंदिरात महाआरतीला आमंत्रित केलं आहे. त्यावरूनही शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. काळाराम मंदिरात राष्ट्रपतींना यांच्यामुळे निमंत्रण मिळणार आहे का? राष्ट्रपती थेट येऊ शकत नाहीत का? काळाराम मंदिरांची याची मालकी आहे का? काळाराम मंदिरात तुम्ही किती वर्षांनी जात आहात? मोदी साहेब काळाराम मंदिरात गेले याचंही यांना वावडं आहे. काळाराम मंदिरमध्ये उद्धव ठाकरे यापूर्वी किती वेळा गेले होते, हे त्यांनी सांगावं. तुम्ही मोदी साहेबांची बरोबरी करू नका, असं संजय शिरसाट म्हणाले.

घराणेशाहीवरून पलटवार

कल्याणमध्ये बोलताना ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. घराणेशाहीला जनता धडा शिकवेल, असं ठाकरे म्हणाले. त्यावरही शिरसाटांनी टीका केलीय. उद्धव ठाकरे आज 19 वर्षानंतर त्या शिवसेनेच्या शाखेत गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना माणसात आणण्याचं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची ही पोच पावती आहे. आता शिवसैनिक जवळ येतात. एकेकाळी आमदारांना जवळ यायला परवानगी नव्हती. हे परिवर्तन झालं त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आहे. घराणेशाही वाक्य तुमच्यासाठी लागू होतं, असं पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.