“आम्ही ज्या शिखरावर गेलो त्याचे तुम्ही पायाचे दगड”; ठाकरे गटाने शिवसेनेच्या बंडखोरांना किंमत दाखवली…

सत्ताधाऱ्यांनाही ठणकावून सांगत म्हटले की, आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपदी येतात आणि जातात मात्र शिवसैनिक हे कायमच पद आहे अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

आम्ही ज्या शिखरावर गेलो त्याचे तुम्ही पायाचे दगड; ठाकरे गटाने शिवसेनेच्या बंडखोरांना किंमत दाखवली...
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 9:07 PM

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार केले होते. त्यानंतर राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिवसेना हा सामना रंगला आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यात असंविधानिक सरकारला आणले असल्याचा सातत्याने त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आताही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर आणि राज्यातील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. यावेळी शिंदे गटावर त्यांनी टीका करत म्हटले आहे की, राजकारणात पदं येतील आणि जातील मात्र शिवसैनिक हे पद बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिलेदारांना दिले आहे.

त्यामुळे आता जरी शिवसैनिक म्हणून बंडखोर आमदार, खासदार मिरवत असले तरी ते पद सहज मिळण्यासारखे नाही असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, शिवसेनेतील कोणत्याही कार्यकर्त्याला सत्तेतील पदे दिले तरी खरे शिवसैनिक घेणारं नाहीत, तर ते फक्त काम करतील असा गौरवोद्गगारही त्यांनी काढला आहे.

त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभा केलेले शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे योगदानही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचं सर्वात मोठे स्वागत मराठवाड्यात झालं आहे.

त्याचबरोबर मराठवाड्यानेही बाळासाहेब ठाकरे पूर्णतः सहकार्य केले असल्याचे सांगत त्यांनी कट्टर शिवसैनिकांचे आभारही त्यांनी मानले आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी फक्त शिवसैनिकांना आधार मानले तर सत्तेला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तर संजय राऊत यांनी बंडखोरी करुन सत्तेत आल्यालानाही त्यांनी कडक शब्दात सुनावले आहे. शिवसेनेतून ज्या ज्या लोकांनी बंडखोरी केली आहे. ज्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत. किंवा ज्या लोकांना महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदारकी पासून खासदारकीपर्यंत पदं मिळाल्यामुळेच ही माणसं मोठी झाली आहेत असं सांगत संजय राऊत म्हणाले की, आम्ही ज्या शिखरावर गेलो आहे त्याचे तुम्ही पायाचे दगडही होऊ शकत नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही ठणकावून सांगत म्हटले की, आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपदी येतात आणि जातात मात्र शिवसैनिक हे कायमच पद आहे अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

चाळीस-पन्नास आमदार आणि गद्दार गेले असतील मात्र पुन्हा आमदार बनणारी ताकद तुमच्यातच असल्याचा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. तरुण पिढीला शिवसेनेचा संघर्ष माहित नाही तो संघर्ष तुम्ही समजून सांगावा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.