अंबादास दानवेंची भाजपवर घणाघाती टीका; म्हणाले, रडीचा डाव म्हणून…

Ambadas Danve on BJP and Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीवर त्यांनी भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा व्हीडिओ...

अंबादास दानवेंची भाजपवर घणाघाती टीका; म्हणाले, रडीचा डाव म्हणून...
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 1:01 PM

लोकसभा निवडणुकीचं वारं देशभरात वाहतं आहे. अशातच विरोधी इंडिया आघाडीकडून महायुतीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक रडीचा डाव म्हणून लढवली जात आहे. यामुळे तांत्रिक कारणाने खेळ होत आहे. आनंद गीते एका नावाची 10 लोक उभे केली जात आहेत. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. तुतारी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. यामुळे लोक आणखी सजग होतात, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

काल सुरतमध्ये लोकसभा उमेदवाराचा फॉर्म रद्द करण्यात आला. त्या फिक्सिंग म्हणता येईल. जे उद्भव ठाकरे सांगता देशात हुकूमशाही येईल त्याच उदाहरण सुरतमधून समोर आलं आहे. विकसित भारत नावाने भाजपने व्हॅन घेऊन गेले होते. नागरिकांनी त्या अडवल्या होत्या. सरकारी कार्यक्रम होत्या त्या व्हॅन भाजप प्रचारासाठी फिरत आहेत. देशाभरात हे सुरू आहे.धंदा दो चंदा लो असं काम सुरू आहे. मी या कंपनीचे काम सुरू आहे. देशात सर्वत्र हे सुरू आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयेगाच्या कार्यपद्धतीवर दानवेंकडून प्रश्नचिन्ह

शिवसेना पक्षच गाण्यावर निवडणूक आयोग सूचना करतं. नरेंद्र मोदी बजरंग बली म्हणताात. अमित शाह अयोध्यावारी फ्री करू म्हणतात. त्यावेळी का कारवाई होत नाही? निवडणूक आयोग भाजपचं बटिक झालं की काय असा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या कचाकचा बटण दाबा अन्यथा निधी मिळणार नाही, असं म्हणतात. याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष का नाही?, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाड्यातील लोक आमच्या पाठिशी- दानवे

संदिपान भुमरे यांनी अनधिकृतरित्या फॉर्म भरला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत फॉर्म भरला. आमची पहिली फेरी संपली. 24-30 दुसरी 1-10 तिसरी फेरी होईल. उध्दव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.मोदींची सभा बघितली तर निस्तेज सभा होती.उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वी आगेकूच करत आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे लोकांचं नुकसान झालं आहे. लोकांचा या सरकारवर भरोसा नाही. म्हणून लोक आमच्या पाठिशी उभे राहतील, असं दानवेंनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.