वॉचमन शाळेला कुलूप लावून निघून गेला, चिमुकली वर्गातच अडकली, रडून रडून हाल; किती तासानंतर आली बाहेर ?

त्या मुलीच्या रडण्याचा आवाज आसपासच्या नागरिकांना ऐकायला आला आणि त्यांनी शाळेत धाव घेतली. कसेबसे वर्गाचे कुलूप तोडले आणि अनेक तासांनंतर ती चिमुरडी वर्गाबाहेर आली. तिला सुखरूप पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वॉचमन शाळेला कुलूप लावून निघून गेला, चिमुकली वर्गातच अडकली, रडून रडून हाल; किती तासानंतर आली बाहेर ?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 5:53 PM

छत्रपती संभाजीनगर | 26 सप्टेंबर 2023 : शाळा हे मुलांच दुसरं घरंच असतं असं म्हणतात. दिवसातला बराचसा वेळ मुलं शाळेत घालवतात, नुसतं पुस्तकी शिक्षण किंवा अभ्यासच नव्हे तर रोजच्या आयुष्यातील अनेक महत्वाचा गोष्टीही मुल तिथेच शिकतात. अभ्यास, मित्रांसोबत डब्याची वाटावाी (Sharing), खेळातून सांघिक भावना वाढीस लागते, प्रश्नांची उत्तरं देऊन मुलं हजरजबाबी होतात, स्टेजची भीती जाते. असे एक ना अनेक फायदे शालेय शिक्षणाचे होतात. त्यामुळे पालकांनाही मुलांच्या शाळेबद्दल एक विशेष ममत्व, विश्वास वाटतो. पण याच शाळेत तुमचा मुलगा किंवा मुलगी अडकले तर ? विचारही करावासा वाटत नाही ना ? पण छत्रपती संभाजीनगर शहरात ही घटना खरोखर घडली आहे.

शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत हा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार घडला आहे. तेथे शाळेच्या वर्गात अवघी पहिल्या इयत्तेत शिकणारी एक चिमुरडी मुलगी (small girl stuck in classroom in school) अनेक तास अडकली होती. विद्यार्थिनी वर्गात असताना देखील वॉचमन खुशाल कुलूप लावून गेल्याने एकच संताप व्यक्त होत आहे. अखेरच स्थानिकांच्या मदतीने त्या चिमुकलीची सुटका करण्यात आली.

काय घडलं नेमकं ?

शहरातील महानगरपालिकेच्या रोजाबाग येथील उर्दू प्राथमिक शाळेतील ही घटना आहे. ही शाळा सकाळच्या आठ ते साडेबारा या वेळात भरते. सोमवारी ( २५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सकाळी आठला शाळा भरली आणि साडेबाराच्या सुमारास सुटली. सर्व मुलं घरी निघून गेली. त्यामुळे शाळेतर्फे नियुक्त करण्यात आलेला वॉचमन विठ्ठल बमने याने थोड्या वेळाने एकेक करत सर्व वर्गाच्या दारांना कुलूप लावले आणि तो निघून गेला.

मात्र पहिल्या इयत्तेत शिकणारी एक मुलगी मात्र वर्गातच राहिली होती, सगळी मुलं बाहेर गेल्याचे तिच्या लक्षातच आले नव्हते. दार लावल्यावर वर्गात कोणीही नसल्याचे तिच्या लक्षात आले आणि घाबरलीच. तिने दाराच्या दिशेने धाव घेत ते ठोठावायला सुरूवात केली, हाका मारू लागली. पण कोणीच आले नाही. ती जोरजोरात रडू लागली.

शाळेतून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तेथे धाव घेतली. तर एका ला बंद असलेल्या वर्गात चिमुरडी मुलगी खिडकीतून पाहत, रडत असल्याचे दिसले. ते पाहून सर्वच हादरले. अखेर स्थानिकांनी महत् प्रयत्नांनी शाळेच्या वर्गाला लावलेले कुलूप हातोड्याने तोडले आणि दार उघडले. त्या मुलीने लगेच बाहेर धाव घेतली आणि तिला सुखरूप पाहून सर्वांनी नि:श्वास सोडला. मात्र रडून रडून त्या मुलीची अवस्था बिकट झाली होती, ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

मुलगी घरी आली नाही ते पाहून तिचे पालकही तिचा शोध घेत शाळेत आले होते. अखेर त्या मुलीला सुखरूपपणे आई-वडिलांच्या हवाली करण्यात आले. मात्र, या सर्व घटनेनंतर शाळा प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, याची दाखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. तसेच वर्ग नीट न तपासता बेजबाबदारपणे वर्गांना कुलूप लावून गेलेल्या वॉचमनविरोधातही संताप व्यक्त होत असून त्याला काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.