अंबादास दानवे की चंद्रकांत खैरे? छत्रपती संभाजीनगरमधून कुणाला उमेदवारी?
Shivsena Uddhav Thackeray Group Loksabha Candidate Election 2024 : ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहेत. यातील 17 उमेदवारांची यादी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोन्ही नेत्यांनी दावा केला होता. कुणाला उमेदवारी मिळाली? वाचा...
ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर केली गेली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं होतं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या जागेवर दावा केला होता. तसंच माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही या जागेवरून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली होती. आज उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे उमेदवार असतील.
खैरे काय म्हणाले?
उमेदवारी जाहीर होताच चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. तसंच निवडून येण्यातचा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेचे उमेदवारी मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीत जिंकून येईल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे. तिकिटासाठी थोडा बहुत संघर्ष करावा लागला. त्यामुळे यावेळी ते थोडे भावनिक सुद्धा झाले होते.
आता तिकीट मिळालं आता अंबादास दानवे ही विरोधात काम करणार नाहीत. शिवसेनेची पद्धत आहे. एक वेळा तिकीट मिळाल्यावर सगळे जोमाने काम करतात. तसे जोमाने काम करू आम्ही निवडून येऊ.इम्तियाज जलीलशी ही आमची स्पर्धा नाही. आम्ही लढू आणि जिंकू असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
2. यवतमाळ- संजय देशमुख
3. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
4. सांगली -चंद्रहार पाटील
5. हिंगोली- नागेश अष्टीकर
6. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
7. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
9. नाशिक- राजाभाऊ वाझे
10. रायगड – अनंत गिते
11. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
12. ठाणे- राजन विचारे
13. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
14. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
15. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
16. परभणी- संजय जाधव
17. मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
छत्रपती संभाजीनगरमधून खैरेंना उमेदवारी
छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी म्हणून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आग्रही होते. अंबादास दानवे नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. दानवे शिंदे गटात किंवा भाजपत जातील, अशी चर्चा वारंवार होत होती. मात्र दानवे यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण कायम ठाकरेंसोबत राहणार असल्याचं जाहीर केलं. आज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे.