चंद्रकांत खैरेंसोबत कोणत्या मुद्द्यावरून वाद?; अंबादास दानवे यांचा पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा
Ambadas Danve on Chandrakant Khaire : मागच्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेना ठाकरे गटात वाद पाहायला मिळतो आहे. लोकसभेच्या उमेदवारीवरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत दानवे यांनी मोठा खुलासा केला आहे.
दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये वाद असल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यात वाद पाहायला मिळतोय. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. आमच्यामध्ये वाद आहे, असं म्हणतात. पण या ठिकाणी तीन जणांनी तिकीट मागितलं. हा काही वाद असी शकत नाही. मी दहा वर्षापासून इच्छुक होतो, असं अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे काय म्हणाले?
काही लोकांनी भेटायला वेळ 10 ची दिली होती. 9 वाजता येऊन भेटा म्हटलं, असं होत नाही.पक्षप्रमुख पुढे आग्रह करणे योग्य नाही. 11. 30 वाजता ते सगळ्यांना भेटणार होते, आता नेते आहेत. त्यांच्या वेळा बघितलं पाहिजे. आमच्या घरातल्या भगिनी आहेत. चहाला बोलावलं तर सगळं होईल, असं अंबादास दानवे म्हणाले.
जागावाटप कधी?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार याची सर्वत्र चर्चा होतेय. त्यावरही दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय. फॉर्म्युला ठरला आहे. लवकरच घोषणा होईल.महाविकास आघाडी उध्दव ठाकरे यांच्याशी लढत देण्यासाठी किती प्रयत्न करावे लागता.महासत्ता म्हणता मग आमच्या विरुद्ध लढायला एक एक माणूस जमा करावं लागत आहे. तुमच्या विरोधात जनमत आहे. आणखी किती माणसं घ्यायची ती घ्या, असं अंबादास दानवे म्हणाले.
मनसे-भाजप युतीवर दानवेंची प्रतिक्रिया, काय म्हणाले?
राज ठाकरेंमुळे महायुतीला काहीही बळ मिळणार नाही. उलट तुम्ही त्यांना घ्या. आमचा फायदा होईल. राज ठाकरे यांना सोबत घेतल्यावर काय बोलणार? कोणत्या तोंडाने लाव रे तो व्हीडिओ म्हणाले. उमेदवार कोणी असो कराड, सावे किंवा शिंदे गटाचा असो आम्ही तयार आहोत.पक्ष प्रमुख माहीत आहे. कोण कोण तयार आहे त्यामुळे पक्षप्रमुख ठरवतील. उमेदवार जाहीर होईपर्यंत मी अद्याप इच्छुक आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.