यंदाच्या लोकसभेला आम्ही 16 जागा लढणारच…; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले

Shivsena Shinde Group Sanjay Shirsat on Mahayuti Jagavatap : महायुतीचं जागावाटप अन् शिंदे गटाचे उमेदवार; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान... शिवसेना एकनाथ शिंदे गट किती जागा लढणार? शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आकडा सांगितला. नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

यंदाच्या लोकसभेला आम्ही 16 जागा लढणारच...; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 1:58 PM

महायुतीच्या जागावाटप संदर्भात मुख्यमंत्री यांच्या बैठकी सुरू आहे. सर्व जागा निवडून येईल अशी रणनीती आहे. 2 दिवसात कोण कुठली जागा लढवणार हे स्पष्ट होईल. नाशिक, सिंधुदूर्ग, छत्रपती संभाजीनगर या 3 ही जागा आमच्याच असेल असा आमचा अंदाज आहे. 2 तारखेपासून नेत्यांचे दौरे सुरू होतील. त्या चर्चा असणाऱ्या 3 ही जागा आम्हालाच मिळतील. भाजपने 24 जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित जागा तयारी झालीय. आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याचा तयारीत आहोत. 16 पेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत, असं विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

“…तर उमेदवार बदलला जाईल”

छत्रपती संभाजीनगरची जागा महत्वाची आहे. इथून शिवसेनाप्रमुखांनी सुरुवात केली होती. कालच बैठक झाली आहे. ही जागा शिवसैनिकाला सुटावी अशी आमची मागणी आहे , अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. 8 उमेदवार दिले आहेत. कुणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात. त्याची शक्यता नाकारता येत नाही, असं संजय शिरसाट म्हणालेत.

काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात- शिरसाट

सुनीत तटकरे काय जाहीर करतील माहीत नाही. मात्र नाशिकची जागा आम्हाला मिळेल. आम्ही ती घेणारच आहोत. काँग्रेसचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. सतत असतात. रोहित पवार कुठं काय बोलतात हे त्यांनाच कळत नाहीय ते जोरात जोमात आणि काही दिवसांनी कोमात असेल. राजकारणातील ते केष्टो मुखर्जी आहेत… कुणाला ते काय बोलतील याचा नेम नाही, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

काल दिल्लीत टोमण्याचा नवा प्रयोग झाला. वस्तुस्थिती अशी होती की भाषणाला शून्य प्रतिसाद होता. क्रमवारी पहिली तर स्वाभिमान कुठं गेला ते दिसले. आता तुमची जागा खूप खाली गेलीय. त्यांचे दर्शन आता तुम्हाला घ्यावे लागेल आता पुन्हा स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.