Prakash Ambedkar : आमचा उमेदवार निवडून आणा आणि मग… मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांचा हा प्रस्ताव मान्य करतील का?

Prakash Ambedkar Offer : गेल्यावर्षी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यावर प्रकाश आंबेडकर अंतरवाली सराटीत गेले आणि सहानुभूती दाखवली. यंदा त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेला विरोध केला. आता प्रकाश आंबेडकर यांनी अजून एक राजकीय वळण घेतले आहे. त्यांनी आता जरांगे पाटलांना असा प्रस्ताव दिला आहे.

Prakash Ambedkar : आमचा उमेदवार निवडून आणा आणि मग... मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांचा हा प्रस्ताव मान्य करतील का?
प्रकाश आंबेडकरांची जरांगे पाटील यांना कोणती ऑफर?
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 5:22 PM

गेल्यावर्षी ऑगस्टनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्यासह अनेक जण उपोषणाला बसले. लाठी हल्ला झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले. राज्यातील अनेक बडे नेते जरांगेंच्या भेटीला गेले. जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यावर प्रकाश आंबेडकर अंतरवाली सराटीत गेले आणि सहानुभूती दाखवली. यंदा त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेला विरोध केला. आता प्रकाश आंबेडकर यांनी अजून एक राजकीय वळण घेतले आहे. त्यांनी आता जरांगे पाटलांना असा प्रस्ताव दिला आहे. कोणते आहे हे राजकीय वळण?

मी औरंगाबादच म्हणणार

मी औरंगाबाद म्हणत राहणार, औरंगाबाद म्हणणं सोडणार नाही, ज्याला कोणाला नवीन नावाने ओळखायच असेल त्यांनी हायकोर्टाला विनंती करावी की नामांतर करावं. त्यांनी नामांतर केलं की आम्ही नामांतर करतो माझा विरोध नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. राज्य शासनाने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केले असले तरी आंबेडकरांनी शहराच्या नामांतराला विरोध केला आहे.

हे सुद्धा वाचा

हा हिंदूमधील अंतर्गत वाद

दुर्दैवाने ओबीसी हिंदू आहे, आरएसएस आणि बीजेपी हे वैदिक हिंदू आहेत. हे भांडण आता पुन्हा सुरू झालं अशी परिस्थिती आहे.मुसलमान, जैन, बौद्ध, शिख यांचा या भांडणाची काही संबंध नाही.हा हिंदू धर्मातील अंतर्गत वाद आहे. वैदिक हिंदू आणि संत परंपरेतील हिंदू यांच्यातील वाद उफाळून आला आहे, तो वाद आपल्याला या इलेक्शनमध्ये दिसतोय अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या मागण्याची आम्ही सहमत नाही. परंतु ओबीसी आणि जरांगे पाटील यांच्या मागणीतील साम्य काय आहे, आरक्षण साम्य आहे.दोघांचाही आरक्षणाला विरोध नाही, पण वैदिक हिंदुजा आरक्षणवाले आहेत. त्यांचा आरक्षण या कन्सेप्टला विरोध आहे. या इलेक्शन मध्ये जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी असा लढा होणार आहे तो लढा जरी झाला तरी आरक्षणाला धोका नाही.परंतु आरएसएसवाले वैदिक हिंदूला याचा धोका निर्माण झाला अशी परिस्थिती आहे, असे त्यांनी मत मांडले.

आमचं सरकार आणा, मागणी मान्य करतो

आमचं सरकार सत्तेत आणा. जरांगे पाटलांना सरळ सांगतो माझं सरकार आलं तर तुम्हाला असं काही करण्याची गरज पडणार नाही. मी जरांगे पाटील यांना एवढेच म्हणणार आहे, वंचित बहुजन आघाडीचे जेवढे उमेदवार आम्ही उभे केले आहेत त्यांना तुम्ही निवडून आणा तुमची मागणी मान्य करतो, अशी ऑफर त्यांनी दिली.

अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?.
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु.
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण.
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.