सोने 70 हजारांच्या घरात; राज्यातील या दोन शहरात रचला इतिहास
Gold Silver Rate Today : मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि देशातील सुवर्णपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाच्या सराफा बाजारात सोन्याने 70 हजारांचा टप्प गाठला. गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आज शुक्रवारी जळगावमध्ये सोन्याने हा विक्रम नावावर नोंदवला.
मार्च महिन्यात सोन्याचा विक्रमावर विक्रम सुरु आहे. 21 मार्च रोजी सोन्याने मोठा विक्रम नावावर नोंदवला होता. सोने 67,000 रुपयांच्या घरात पोहचले होते. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी सोन्याने लांबचा पल्ला गाठला. तर शुक्रवारी सुवर्णनगरी जळगावमध्ये पण सोन्याने किंमतीचा नवा विक्रम नावावर केला. दोन्ही शहरात 10 ग्रॅम सोने 70 हजारांच्या घरात पोहचले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. अर्थात जीएसटीसह या किंमती आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सुवर्णनगरीत सोने चकाकले
देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारत सोन्याचे भाव 70 हजार रुपयांवर पोहोचले. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातील आतापर्यंतचे सोन्याचे सर्वात जास्त दर असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
- 24 कॅरेट सोन्याचे दर 68 हजार रुपयांच्या घरात
- जीएसटी सहित हा दर 69 हजार 900 रुपयांवर पोहोचला
- गेल्या दोन महिन्यात 62 हजार रुपयांवर असलेले सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या घरात
- जागतिक बाजारात सोन्यात गुंतवणूक वाढल्याचा परिणाम
- लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्याने अनेकांच बजेट कोलमडले
दोन महिन्यात मोठी दरवाढ
गेल्या दोन महिन्यापूर्वी सोन्याचे दर हे 62 हजार रुपये इतके होते. आता सोन्याचे दर हे 69 हजार 900 रुपये इतके वधारले आहेत. गेल्या दोन महिन्यात सोन्यात 7 ते 8 हजार रुपयांची दरवाढ झाली. जागतिक बाजारात घडत असलेल्या घडामोडी व त्यातच देशासह विदेशातील बाजारांमध्ये सोन्यामध्ये वाढलेली गुंतवणूक त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सोने 70 हजारांच्या घरात
10 ग्रॅम सोन्यासाठी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राहकांना यावेळी जादा दाम मोजावे लागले. गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 67,500 रुपये होता. त्यावर 3 टक्के जीएसटीसह हा भाव 69,525 रुपयांच्या घरात पोहचला. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे मात्र पांढरे झाले. गुरुवारी शहरात सोन्याला आजपर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. या दरवाढीमुळे ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.