आता ही नवीन बाई आली, रोज काही ना काही बडबडते, इम्तियाज जलील यांचा कंगणावर प्रहार; नवनीत राणांबद्दल काय म्हणाले?

Imtiaz jaleel on Kangana Ranaut and Navneet Rana : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच नवनीत राणा यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केलाय. इम्तियाज जलील माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आता ही नवीन बाई आली, रोज काही ना काही बडबडते, इम्तियाज जलील यांचा कंगणावर प्रहार; नवनीत राणांबद्दल काय म्हणाले?
कंगना रणौत, इम्तियाज जलील
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 5:54 PM

माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका केली आहे. पहिल्यांदा लोकसभा पाहायला मिळतेय. म्हणून काहीही बोलायचं… मीडियाच्या लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेक लोक असे बोलतात. यादी भाजपची अमरावतीची खासदार होती. तिला माहीत होतं की आपण काहीतरी वेगळं बोललं की मीडियात आपल्याला दाखवतात. मात्र सगळ्यांना माहित आहे की काय झालं. आता ही नवीन बाई आली आहे दररोज काही ना काही तरी बडबड करते, असं इम्तियाज जलील म्हणालेत.

कंगना रनौत यांच्यावर निशाणा

सगळ्यात जास्त यशाचा कारभार हिमाचलमध्ये चालतो. आणि कंगना रनौत या तर तिथल्या खासदार आहेत. दुसऱ्यावर बोट दाखवताना कंगना रनौतने आपल्या राज्यात कशाप्रकारे ड्रग्सचा आणि नशेचा कसा कारभार चालतो. त्यावर लक्ष दिलं तर चांगलं होईल, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी कंगना रनौत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील आणि एमआयएमची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावरही जलील यांनी भाष्य केलंय. जातीच्या आधारावर निवडणुका लढायला सुरुवात केली. तर हा देश, हे राज्य कुठे जाईल माहित नाही? आपण सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन एकत्र राहिले तर हा चांगला प्रयोग असेल. सगळ्या जातीत चांगले लोक असून तुम्ही सगळ्यांना संधी दिली तर चांगला प्रयोग असेल, असं इम्तियाज जलील म्हणाले.

विविध नेत्यांच्या भेटीगाठी

विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणींनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली. बाबाजानी दुर्राणी आणि जलील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी जलील यांची भेट घेतली. इम्तियाज जलील-अब्दुल सत्तारांच्या भेटीचं कारण आहे? यावर जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मित्रता असते, अनेक वर्षांपासून ते माझे मित्र आहेत. मित्रता जपायला पाहिजे. अब्दुल सत्तार जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यांचा सत्कार करायचा होता. तर ते तिथून जात असताना मग आम्ही त्यांना बोलावले. तर मग मी त्यांना चहा पिण्यासाठी बोलावलं होतं. बाबाजानी दुर्राणी आमचे वैयक्तिक मित्र आहेत. त्यामुळे घरगुती स्वरूपाची ही भेट झाली, असं जलील म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.