व्हॉट्सॲपवर विजयाचा उन्माद नको; नाहीतर कारवाईचा बडगा, ग्रुप ॲडमिनला नाहक त्रास

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्याचवेळात हाती येण्यास सुरुवात होईल. कार्यकर्ते आणि समर्थकांनी यावेळी विजयाच्या नादात व्हॉट्सॲपवर जर चुकीची पोस्ट व्हायरल केली तर ग्रुप ॲडमिनला त्याचा फटका बसू शकतो.

व्हॉट्सॲपवर विजयाचा उन्माद नको; नाहीतर कारवाईचा बडगा, ग्रुप ॲडमिनला नाहक त्रास
तर ग्रुप ॲडमिनला फटका
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 8:41 AM

लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अशावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राजवळ गर्दी केली आहे. कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहे, याचे गणित समोर येत आहे. सोशल मीडियामुळे अवघ्या काही क्षणातच पोस्ट व्हायरल होते. अशावेळी आक्षेपार्ह्य, जातीय अथवा इतर काही वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर आल्यास ग्रुप ॲडमिनला फटक बसू शकतो. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अशावेळी ग्रुप ॲडमिनला सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारल्या जाऊ शकतो.

काय आहे आदर्श आचारसंहिता

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात 16 मार्च ते 6 जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू आहे. 4 जून रोजी म्हणजे आज लोकसभेचा निकाल जाहीर होईल. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना कुणाच्या भावना दुखावल्या जातील अशा पोस्ट न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम अथवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर कोणताही समाज, जात, धर्माच्या भावना दुखावतील, अशा प्रकारच्या पोस्ट, बॅनर, कथा अथवा विश्लेषणाच्या आडून कुणा विशिष्ट समाजाच्या, व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील, असे कृत्य न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याविषयी पोलिसांनी ग्रुप ॲडमिनला सावधगिरीचा इशारा दिला आहे. अशी कोणतीही पोस्ट ग्रुपवर न येऊ देण्याची जबाबदारी त्या त्या ग्रुप ॲडमिनची असणार आहे. त्यामुळे अशी पोस्ट दाखल झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

कायदा हातात घेऊ नका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह शहरातील नागरिकांना पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे. विजयाच्या उन्मादात अथवा पराभवामुळे कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते. कायदा न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

अशी घ्या काळजी

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनने या काळात ग्रुपची सेटिंग बदलवून घेणे आवश्यक आहे. कारण इतक्या मोठ्या ग्रुपमध्ये कोणताही सदस्य कोणतीही पोस्ट करु शकतो. अथवा इतर ग्रुपवरील पोस्ट तो तुमच्या ग्रुपवर टाकू शकतो. त्यामुळे वाद होऊ शकतो. असे झाले तर ग्रुप ॲडमिनच्या डोक्याला ताप होऊ शकतो. त्यासाठी ग्रुप ॲडमिनने सेटिंगमध्ये जाऊन ओन्ली ॲडमिन असा बदल करु घ्यावा. त्यामुळे इतर सद्सयांना वादग्रस्त पोस्ट करता येणार नाही. येत्या चार ते पाच दिवस हीच सेटिंग कायम ठेवल्यास त्याच्या डोक्याला ताप होणार नाही. तसेच त्याने ग्रुपला आक्षेपार्ह्य, जातीवाचक, धार्मिक पोस्ट न करण्याचे आवाहन करावे.

बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.