या महापालिकेचे बोधचिन्ह आचारसंहितेच्या कचाट्यात; हा तर सत्ताधाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न, उद्धव सेनेची कमळाचे फूल हटवण्याची मागणी

Municipal Corporation Emblem Lotus Flower : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागलेली आहे. अनेक ठिकाणी नामफलक, श्रेय घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाट्यांना कपडा गुंडाळण्यात आला आहे. पण या महापालिकेच्या बोधचिन्हामुळेच भाजपचा प्रचार होत असल्याचा दावा उद्धव सेनेने केला आहे.

या महापालिकेचे बोधचिन्ह आचारसंहितेच्या कचाट्यात; हा तर सत्ताधाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न, उद्धव सेनेची कमळाचे फूल हटवण्याची मागणी
येथे तर कमळ फुलले, ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 11:38 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष तयारी लागलेले आहेत. निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता सुरू झाली. आता अनेक ठिकाणी श्रेयवादासाठीच्या पाट्या, नामफलक कपड्यात गुंडाळण्यात आलेले आहे. कागद लावून ती झाकण्यात येत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरील नामफलक अंधारात गडप झाले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा घोळ झाला आहे. येथील महापालिकेच्या बोधचिन्हातच कमळाचे फूल आहे. त्यामुळे आचारसंहितेकडे बोट दाखवत, कोणी कुणाला फूल बनवू नये, असा पवित्रा उद्धव ठाकरे गटाने घेतला आहे. महापालिकेच्या बोधचिन्हात कमळाचे फूल आहे, त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार ठाकरे सेनेने केली आहे.

निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या बोध चिन्हातून कमळाचे फूल हटवण्याची मागणी उद्धव सेनेने केली आहे. ठाकरे गटाने कमळाचे फुलावर आक्षेप घेतला आहे. महापालिकेच्या बोधचिन्हातील कमळाच्या फुलांमुळे आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार ठाकरे गटाने केली आहे. निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने तक्रार केली आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून मनपाच्या बोधचिन्हात कमळ आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून ठाकरे गटाचे भाजपशी वाजले आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत लागलीच दिसला आहे.

हे सुद्धा वाचा

हा तर सत्ताधाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न

राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असतांना महानगरपालिकेच्या बोधचिन्हात ‘कमळ’ हे चिन्ह भाजपच्या चिन्हांच्या रंगसंगतीत ठळकपणे दर्शीविलेले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपचा प्रचार होत आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध कार्यालयात ठिकठिकाणी भाजपच्या चिन्हाशी साधर्म्य साधणारे चिन्ह लावले आहे. हा एक प्रकारे भाजपचा प्रचार असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे उप शहर प्रमुख अमित घनघाव यांनी बोधचिन्हातून कमळ हटवण्याची मागणी केली आहे. या नव्या मागणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.