Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचं चॅलेंज स्वीकारलं; अट ठेवत म्हणाले, तर तू…

Manoj Jarange Attack On Chagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचं आव्हान स्वीकारलं आहे. मराठा आंदोलनात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विस्तव जात नाही. दोघेही एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. काय आहे चॅलेंज?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचं चॅलेंज स्वीकारलं; अट ठेवत म्हणाले, तर तू...
मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान स्वीकारलं
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 2:36 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय फैरी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मराठा आंदोलन पेटल्यानंतर त्याविरोधात ओबीसी आंदोलन उभं करण्यात छगन भुजबळ यांनी जाहीर प्रयत्न केले. ओबीसी आरक्षण बचावच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील ओबीसी एकवटण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेशासाठी जरांगे आग्रही आहेत. तर मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका यासाठी भुजबळांनी दंड थोपाटलेले आहेत. आता जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचं हे आव्हानं स्वीकारलं आहे.

काय घातली अट?

वेळ आल्यावर सांगू. त्यांना दम निघणार नाही, असा चिमटा जरांगे पाटील यांनी भुजबळांना काढला. तुम्ही ८ म्हणता आम्ही १६ जागा निवडून आणल्या तर तुमचं आरक्षण सोडणार का? आम्हाला ओबीसीत घ्याल का ? धनगरांना एसटीत आरक्षण देणार का? राजकारण सोडून द्याल का? गोरगरीबाला विरोध चाललाय तो बंद कराल का? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला विरोध करत आहात ते बंद करणार का? अशा प्रश्नांच्या फैरी जरांगेंनी चालवल्या.

हे सुद्धा वाचा

केवळ नुसतं बोलायचं म्हणून बोलत आहात का, असा टोला पण त्यांनी लगावला. आम्ही दुप्पट जागा आणू. तुम्ही सर्व आरक्षण सोडून देणार का. जातीय तेढ निर्माण केली त्यापासून लांब जाणार का. तुमचे विचार थांबवा ना. जाहीरपणे सांग. आम्ही १६ जागा निवडून आणतो, असे आव्हान जरांगे यांनी स्वीकारलं.

आरक्षण म्हणजे राजकारण नव्हे

आरक्षण हा राजकीय आणि वादाचा मुद्दा नाही. याला सामंजस्य लागतं. मनाचा मोठेपणा हवा. सर्व मलाच हवं असं भुजबळांसारखा माणूस नसावा. माणुसकी धर्मातून या गोष्टीकडून पाहिलं पाहिजे. आरक्षण म्हणजे राजकारण असेल असं यांना वाटत आहे. आरक्षण म्हणजे शत्रूत्व आहे, असं भुजबळांना वाटलं पाहिजे. आरक्षणात जात तोलू नये. सुविधा, माणुसकी धर्म पाहिला पाहिजे. हा वादाचा विषयच नाही. या राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी गरीबांना मारलं जात आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केली.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.