फडणवीसांनंतर जरांगेंचा अमित शाहांवर निशाणा; म्हणाले, तुम्हाला कत्तली करायच्यात का?
Manoj Jarange Patil on Amit Shah : मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांच्यावर टीका केली आहे. तसंच जनता एन्काऊंटर करायला लागली तर, तुम्ही दिसणार नाहीत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे, वाचा सविस्तर...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दूजाभाव करू शकत नाही. राज्यात आधी भाजप नव्हतं. तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या थोबाडीत मारून त्यांना दोघांना एकत्रित आणायचं. समजावून सांगायच तर तुम्ही त्यांना बाजूला केला. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची वाट लावली. त्या बांगलादेशी बाईला आणलं आहे. अमित शाह यांना कत्तली करायच्या का? दादागिरीने यांना खुर्ची आणायची आहे. पण जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, अशा शब्दात जरांगेंनी टीका केली आहे.
अमित शाहांवर निशाणा
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दुजाभाव करू शकत नाही. अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगावं. शाह आणि फडणवीस यांना सांगतो जर तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहेत आणि हा कायदा काढला तर ते गोडी गुलाबीने हाताळलं. तर तुम्हाला सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही. तुम्ही जर व्यवस्थित नाही हाताळले तर चीलमीची चहा पिण्याची वेळ येईल. मराठ्यांना बाजूला ठेवलं तर अमित शाह तुमची घोडचूक असे. कोणतीही यंत्रणा जर आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू शकत नाही. असं मनोज जरांगे म्हणाले.
आधी आरक्षण द्या- जरांगे
अमित शाह काय बोलले, ते मी बघितलं नाही. अमित शाह शिर्डीला, नागपूरला आले त्यावेळी आम्ही बोललो होतो. अमित शाह आणि देवेंद्र फडवणीस याना मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल. धनगर आणि धनगड आदेश काढणार असतात तर मराठा आणि कुणबी एकाच आहेत. तो आदेश निवडणूक अगोदर काढावा. हे आंदोलन मराठ्यांचे आहे, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
ममतादिदींकडून डब्बा भरून लाडू आणि शाल घ्यायची मात्र नंतर तींच्याच मागे लागायचं. तुमच्यावर न्याय पालिका खुश नाही.तुम्ही भयानक परिस्थिती करून ठेवली आहे. तुमची काम करण्याची पद्धत म्हणजे खुर्ची आणि खुर्ची…. रामदेव बाबा पाय वाकडे करू करू शिकवीत होता मात्र तुम्ही त्याच प्रोडक्ट बंद केले. काँग्रेसने काही दिले नाही म्हणून तुम्हाला निवडून आणले. काँग्रेस काही देत नाही म्हणून तुमच्या डोक्यावर गुलाल टाकला. आम्हाला महाविकास आघाडी आणि भाजपशी काही घेणं- देणं नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.