मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा पारा चढला; थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली; मराठा कार्यकर्ते का भडकले?

Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई ईरेला पेटली आहे. पंढरपूर, वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीत आरक्षण आणि आरक्षण बचाव या दोन्हीसाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व आंदोलनांना धार आली आहे. त्यातच आता मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा पारा चढला; थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली; मराठा कार्यकर्ते का भडकले?
मराठा आंदोलक का भडकले
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 12:07 PM

मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा संयम सुटत असल्याचे दिसत आहे. राज्यात आरक्षणाची लढाई अटी-तटीवर आली आहे. मराठा आंदोलक ओबीसी आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणून असे तीन ध्रुव झाले आहेत. राज्यातील अंतरवाली सराटी, वडीगोद्री आणि पंढरपूर हे नकाशावर आले आहे. राज्य सरकारपुढे विधानसभेपूर्वीच मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यातूनच आता कोणताही तोडगा दिसत नसल्याने आणि काही मंडळी मुद्दामहून पेच वाढवत असल्याची भावना मराठा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते आहे. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलकांनी उग्र आंदोलन केले आहे.

मराठा कार्यकर्ते आक्रमक

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात येऊन हा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. त्यानंतर तहसीलदाराच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खुर्चीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. मनोज जरंगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी खुर्ची पेटवण्यात आली. खुर्ची पेटवून फुलंब्री तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

16 सप्टेंबरपासून उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर पुन्हा 16 सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून गेले आहे. सरकारने जी आश्वासनं दिली होती. त्यातील काहींची अंमलबाजवणी झाली नाही. तर मुंबईच्या वेशीवर सरकारने सगेसोयऱ्याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही त्याची सहा महिन्यात काही अंमलबजावणी झाली नाही. त्यानाराजीने जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. महायुतीला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका लोकसभेला सहन करावा लागला आहे.

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दोन दिवसांनी दहा दिवस पूर्ण होतील. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाचा रोष वाढत असल्याचे फुलंब्रीच्या घटनांमधून दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. आता जरांगे पाटील यांनी मागे हटणार नसल्याचे जाहीर केल्याने राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची याच घडामोडींवर बैठक होत आहे. त्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.