EVM वरून केले जाणारे आरोप अन् बाबा आढाव यांचं आंदोलन; मेधा पाटकर यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Medha Patkar on Baba Adhav Andolan : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी EVM वरून केले जाणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच बाबा आढाव यांचं पुण्यात सुरु असणाऱ्या आंदोलनावर मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेधा पाटकर काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

EVM वरून केले जाणारे आरोप अन् बाबा आढाव यांचं आंदोलन; मेधा पाटकर यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
बाबा आढाव, मेधा पाटकर Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:21 PM

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमकडे बोट दाखवलं. ईव्हीएममध्ये काही तांत्रिक गोष्टींच्या आधारे महायुतीने हे यश मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. अशातच पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव ईव्हीएम विरोदात आंदोलन करत आहेत. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ बाबा आढाव पुण्यातील फुलेवाड्यात आत्माकलेष उपोषण करत आहेत. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मेधा पाटकर यांनी ईव्हीएमबाबत काय म्हटलं?

अनेक देशांनी ईव्हीएम सोडलं आहे. ईव्हीएममध्ये डीजीटीलाईजेशन झालं आहे. कंट्रोल रूममध्ये बसून हॅकिंग न करता सिम न बदलता काही घडवलं जातं. मी प्रयत्न केला होता. मला गोंधळ कळाला होता. काही संवेदनशील असतात. राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाचे नाते असेल तर आचार संहिता सुरू असताना वाटप होते त्यामुळे मत विकत घेतले जातात, असं मेधा पाटकर म्हणाल्या.

बाबा आढावांच्या आंदोलनावर काय म्हणाल्या?

बाबा आढाव यांचं आंदोलन हे फक्त ईव्हीएम पुरता प्रश्न उपस्थित करत नाही. तर संविधान अंमलबजावणी देखील आहे. मूठभर लोकांच्या हातात सगळे पैसे नको. असं असताना याच्या उलट पाहावं लागतं. राहुल गांधी यांच्या यात्रेने फक्त होणार नाही. ९४ वर्षापासून लढणाऱ्या बाबा आढाव यांना का बसण्याची प्रेरणा मिळाली?, असं मेधा पाटकरांनी म्हटलं आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मेधा पाटकांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही पक्ष जर असेल तर आम्हाला मुद्दे मांडावे लागतात. काय होईल ? अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न आहे. कुणी बंडखोरी करते आणि कोण कुठे जाणार हे सांगता येत नाही. विधानसभा आणि लोकसभेत प्रश्न मार्गी लागत नाहीत, अशी खंत मेधा पाटकर यांनी बोलून दाखवली आहे.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाल्या?

यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने मोठा प्रभाव टाकला आहे. यावरही पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा योजनांनी प्रश्न पूर्ण सुटणार नाही. १५०० मिळाले असं का वाटावं? जमीन घर हिसकावून घेतलं. त्यांना जे काही मिळेल ते घ्यावं लागतं, असं मेधा पाटकरांनी म्हटलं आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.