विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमकडे बोट दाखवलं. ईव्हीएममध्ये काही तांत्रिक गोष्टींच्या आधारे महायुतीने हे यश मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. अशातच पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव ईव्हीएम विरोदात आंदोलन करत आहेत. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ बाबा आढाव पुण्यातील फुलेवाड्यात आत्माकलेष उपोषण करत आहेत. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनेक देशांनी ईव्हीएम सोडलं आहे. ईव्हीएममध्ये डीजीटीलाईजेशन झालं आहे. कंट्रोल रूममध्ये बसून हॅकिंग न करता सिम न बदलता काही घडवलं जातं. मी प्रयत्न केला होता. मला गोंधळ कळाला होता. काही संवेदनशील असतात. राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाचे नाते असेल तर आचार संहिता सुरू असताना वाटप होते त्यामुळे मत विकत घेतले जातात, असं मेधा पाटकर म्हणाल्या.
बाबा आढाव यांचं आंदोलन हे फक्त ईव्हीएम पुरता प्रश्न उपस्थित करत नाही. तर संविधान अंमलबजावणी देखील आहे. मूठभर लोकांच्या हातात सगळे पैसे नको. असं असताना याच्या उलट पाहावं लागतं. राहुल गांधी यांच्या यात्रेने फक्त होणार नाही. ९४ वर्षापासून लढणाऱ्या बाबा आढाव यांना का बसण्याची प्रेरणा मिळाली?, असं मेधा पाटकरांनी म्हटलं आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मेधा पाटकांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही पक्ष जर असेल तर आम्हाला मुद्दे मांडावे लागतात. काय होईल ? अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न आहे. कुणी बंडखोरी करते आणि कोण कुठे जाणार हे सांगता येत नाही. विधानसभा आणि लोकसभेत प्रश्न मार्गी लागत नाहीत, अशी खंत मेधा पाटकर यांनी बोलून दाखवली आहे.
यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने मोठा प्रभाव टाकला आहे. यावरही पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा योजनांनी प्रश्न पूर्ण सुटणार नाही. १५०० मिळाले असं का वाटावं? जमीन घर हिसकावून घेतलं. त्यांना जे काही मिळेल ते घ्यावं लागतं, असं मेधा पाटकरांनी म्हटलं आहे.