शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

दौऱ्याच्या तयारीसाठी आज शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाप्रमुख बबन बारसे आणि मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख यांच्यात शाब्दीत चकमक उडाली.

शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 7:19 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : शिवसेनेचे नांदेडमध्ये दोन गट झालेत. त्यानंतर संपर्क प्रमुख बबन थोरात यांची कार्यपद्धती चांगलीच चर्चेत आलीय. निष्ठावंत जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांना सहसंपर्क प्रमुख बनवून अडगळीत टाकले. बबन थोरात जिल्ह्यात चर्चेत आले आहेत. तर आज चक्क एका निष्ठावंत शिवसैनिकांला हाकलून लावले. ठाकरे गटातील धुसफूस बाहेर आलीय. त्यामुळे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्याविषयी प्रचंड खदखद असल्याचे बोलले जाते.

ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी आज शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाप्रमुख बबन बारसे आणि मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख यांच्यात शाब्दीत चकमक उडाली. त्यानंतर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणमारी झाली. हा वाद शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण दिसून आले.

पक्ष बदललेल्यांची स्तुती

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे शुक्रवारी हिंगोली आणि नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संपर्क प्रमुख बबन थोरात हे माजी खासदार सुभाष वानखेडे ज्यांनी तीन वेळा पक्ष बदलला त्यांची स्तुती करीत होते.

थोरात यांना थांबवण्याचा प्रयत्न

मुदखेड उपतालुकाप्रमुख आणि निष्ठावंत कार्यकर्ते गुलाब देशमुख हे बैठकीतून उठले. मला दोन मिनिटे बोलू द्या, असे म्हणून त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी थोरात यांनी देशमुख यांना खाली बसविले. अन् पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. परंतु, परत एकदा देशमुख उठले आणि त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.

दोघांमध्ये फ्रीस्टाईल

संतप्त झालेल्या थोरात यांनी देशमुख यांना बाहेर निघून जा असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी आम्हाला गेट आऊट म्हणता का? असा सवाल केला. तोच जिल्हाप्रमुख बबन बारसे हे रागाने देशमुख यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणमारी झाली.

देशमुख यांनी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करून त्यांची समजूत घातली. एकूणच या प्रकारामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....