“महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा”; भाजप मंत्र्याचा आदेश वजा सूचना
अधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखा, समन्वय राखा ही पक्षाची मंडळी लोकांमध्ये जात असल्यामुळे यांना अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करावे. तसेच कार्यकर्त्यांसोबत समन्वय राहिल याचीही अधिकाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : राजकारणातील नेते आणि प्रशासनातील अधिकारी यावरून अनेकदा चांगले-वाईट प्रसंग समोर आले आहेत. तर कधी कधी राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यामधील वादावादीचे प्रसंगही समोर आले आहेत. त्यातच आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल विभागाचे अधिकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधा अशा सूचना वजा आदेश दिल्याने याची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज महसूल विभागाचे अधिकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची समन्वयासाठी बैठक घेतली होती.
या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा असा आदेश वजा-सूचना महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी भाषणाच्या शेवटी निवेदन देताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या सूचना केल्या आहेत.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन केले आहे. त्याच बरोबर अधिकाऱ्यांना त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर योग्य समन्वय साधण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी ते म्हणाले की, प्रशासकीय कामासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य लागले तर त्यांच्या अडवणूक न करता त्यांना सहकार्य करा असंही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखा, समन्वय राखा ही पक्षाची मंडळी लोकांमध्ये जात असल्यामुळे यांना अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करावे. तसेच कार्यकर्त्यांसोबत समन्वय राहिल याचीही अधिकाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलतानाही त्यांनी हिच भूमिका मांडली आहे. आमचे पदाधिकारी सगळीकडे काम करतात, लोकांना भेटतात, अधिकारी कार्यकर्ते समन्वयाने काम केले तर लोकांना फायदा होणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे आज मी बैठक घेतली असे सांगत यामध्ये आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनाचे कार्यकर्ते सोबत घ्या, समन्वय राहिल, विरोधी पक्षाच्या अडचण होईल मात्र अधिकाऱ्यांनी त्याबाबत फारसा विचार करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
या बैठकीच्या माध्यमातून भाजप प्रचार आहे का असे विचारल्यावर तुम्ही काहीही समजा असंही विखे पाटील यांनी बोलता बोलता म्हणाले.
तसेच वाळू धोरणाला कुणी कितीही अडवणूक केली तर धोरण आम्ही यशस्वी करणार असल्याचे सांगत अनेक लोकांचे यामध्ये हितसंबंध जोपासले आहेत.
या हितसंबंधांना बाधा येत असल्यामुळे आम्हाला सहकार्य मिळत नाहीय, पण आम्ही सगळ्या गोष्टींचे निरीक्षण केले आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
वाळू प्रकरणात जे अधिकारी लाच घेतील त्यांच्यावर लाच लुचपत विभागाबरोबरच महसूल विभागही कारवाई करेल. तसेच यापुढे आर्थिक हितसंबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
आमचे कर्मचारी अवैध कृत्यात सहभागी असेल तर त्यावरही महसूल विभाग कारवाई करेल असा सूचक इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.