गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हे काय घडलं? पत्र्याचं शेड पत्त्याच्या इमारती सारखं कोसळलं, पाहा VIDEO

डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सोमवारी (8 मे) छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे आयोजित करण्यात आला होता. महालगावमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी एक अतिशय अनपेक्षित अशी घटना घडली.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हे काय घडलं? पत्र्याचं शेड पत्त्याच्या इमारती सारखं कोसळलं, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 12:50 PM

छत्रपती संभाजीनगर : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमावेळी एक धक्कादायक प्रकार घडलाय. गौतमी मंचावर नृत्य करत होती. शेकडो चाहत्यांची समोर गर्दी बसलेली होती. चाहत्यांकडून गौतमीच्या नृत्य पाहण्याचा आनंद लुटला जात होता. पण याच दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी एका दुकानाच्या पत्राच्या शेडवर बसेलेले चाहते थेट जमिनीवर आले. संबंधित दुकानाचं पत्र्याचं शेड जास्त जणांच्या वजनामुळे पत्यांच्या इमारतीसारखं खाली कोसळलं. संबंधित घटनेचा व्हिडीओ अतिशय चित्तथरारक असा आहे.

डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सोमवारी (8 मे) छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे आयोजित करण्यात आला होता. महालगावमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती. जागा कमी पडल्याने गौतमीचे चाहते एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर जावून बसले. नेहमीप्रमाणे आजही कार्यक्रमासाठी चाहत्यांची तुफान गर्दी आलेली होती. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहते मिळेल त्या ठिकाणी, जागा असेल त्या ठिकाणी उभे राहून किंवा बसून कार्यक्रम पाहत होते. या कार्यक्रमाला रंगत आलेली असताना अचानक पत्र्याचं शेड कोसळलं आणि मोठा गोंधळ उडाला.

संबंधित घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे. अतिशय थरारक अशी घटना दिसतेय. या घटनेत कुणी जखमी झालंय का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण ही घटना अतिशय भयानक आणि जीवघेणी होती. घटना घडली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यक्रम देखील बंद पडला.

हे सुद्धा वाचा

याआधी छत कोसळून एकाचा मृत्यू

विशेष म्हणजे शेड कोसळून चाहते पडण्याची ही पहिली घटना नाही. याआधी एका ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आलेल्या गर्दीमुळे एका जणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी त्यावेळी तिचे चाहते एका शाळेच्या कौलारु छतावर चढले होते. पण जास्त वजनाने ते छत कोसळलं होतं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता.

गौतमीचा कार्यक्रम आणि राडा

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि राडा हे जणू काही समीकरणच बनलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. शेकडो तरुण तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात. यावेळी काही टवाळखोर लोकं धिंगाणा घालतात. त्यामुळे पोलिसांना या टवाळखोरांना आवरणं कठीण होऊन बसतं. परिणामी पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज करावा लागण्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.