Video : चक्क कुत्र्यांनी माजी महापौरांचा 15000 रुपयांचा बूट पळवला, दोन दिवस शोधाशोध; अख्खी महापालिका…

औरंगाबदमध्ये कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. त्याचा फटका चक्क माजी महापौरांना बसला आहे. चार कुत्र्यांनी माजी महापौरांचा बूट पळवला आहे. हा बूट 15 हजार रुपयांचा होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Video : चक्क कुत्र्यांनी माजी महापौरांचा 15000 रुपयांचा बूट पळवला, दोन दिवस शोधाशोध; अख्खी महापालिका...
Stray DogsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 9:29 AM

औरंगाबाद : कुणाची कोणती वस्तू कधी हरवेल याचा काही नेम नसतो. कधी ती स्वस्तातील असते तर कधी महागडी असते. पण प्रत्येकासाठी आपली वस्तू प्रिय आणि मौल्यवान असते. या वस्तूचा शोध घेण्यासाठी मग अख्खं घर डोक्यावर घेतलं जातं. ती वस्तू मिळावी हाच त्यामागचा हेतू असतो. ती वस्तू जर महागडी असेल तर मग बघायलाच नको. त्यासाठी जंग जंग पछाडलं जातं. तसंच काहीसं औरंगाबादमध्ये घडलं आहे. औरंगाबादमध्ये चक्क माजी महापौरांचाच बूट चोरीला गेला. चक्क कुत्र्यांनीच महापौरांचा बूट पळवल्याचं उघडकीस आलं आणि त्यानंतर जी धावपळ, पळापळ झाली ती विचारायलाच नको.

औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी त्यांच्या मातोश्री या निवास्थाना बाहेर त्यांचा 15000 रुपयांचा बूट ठेवला होता. त्यांच्या घराबाहेर ठेवलेला हा बुट चक्क कुत्र्यांनी चोरी केला असल्याची घटना घडली आहे. बूट हरवल्याचं उघड झाल्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली. महापौरांनी तर आपला 15000 रुपयांचा बूट शोधण्यासाठी औरंगाबाद महापालिकाच कामाला लावली. बूट चोरीला गेला म्हणून महापौरांनी चक्क औरंगाबाद महापालिकाच कामाला लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावरून महापौरांवर टीकाही होत आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीत काय दिसले?

महापौरांच्या बूटाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यात आला. त्यावेळी महापौरांच्या घरात चार कुत्रे शिरताना दिसले. हे चारही कुत्रे आत जातात. त्यानंतर बराचवेळ सीसीटीव्हीत काही दिसत नाही. थोड्यावेळाने एक कुत्रा आतून येताना दिसतो. त्यापाठोपाठ दुसरा आणि तिसरा कुत्राही अंगणात आला. पाठोपाठ चौथा कुत्राही आला. हे चारही कुत्रे महापौरांच्या घराच्या पायरीजवळ जातात. दोन कुत्रे नंतर माघारी येतात. एक कुत्रा तोंडात बूट घेऊन येतो. तो बूट खाली ठेवतो. दुसरा कुत्रा तो बूट तोंडात पकडतो आणि बाहेर निघून जातो. त्याच्यासोबत इतर कुत्रेही बाहेर पळतात. हा सीसीटीव्ही पाहूनच डॉग स्क्वॉड पथकाने या कुत्र्याचा शोध घेतला आहे.

अखेर कुत्रे सापडले

दरम्यान, महापालिका कर्मचारी आणि महापौरांनी बुटाची शोधाशोध केली. महापालिकेच्या डॉग स्कॉडने बूट पळवणारे कुत्रे पकडेल. महापौरांच्या निवासस्थानाजवळच हे कुत्रे सापडले आहेत. दोन दिवसांपासून महापालिका या कुत्र्याचा शोध घेत होती. परिसरातील सर्व कुत्रे पालिकेने शोधले. अखेर दोन दिवसानंतर एक कुत्रा सापडला आहे. पण या कुत्र्याकडील बूट सापडलेला नाही.

माजी महापौर काय म्हणाले?

या सर्व प्रकारावर माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आला आहे. रविवारी 11 तारखेला मला त्याचा अनुभव आला आहे. रात्री उशिरा माझ्या घरासमोरून चार कुत्र्यांनी मिळून माझा बूट पळवला. बूट महत्त्वाचा नाही. त्याला मी महत्त्व देत नाही. कुत्र्यापासून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

त्यामुळे महापालिकेने आता यंत्रणा प्रभावीपणे राबवली पाहिजे. कुत्र्यांची वाढणारी संख्या नियंत्रणात आणली पाहिजे. मागेही चार वर्षाच्या विद्यार्थ्यांचा कुत्र्याने लचका तोडला होता. त्यात तो ठार झाला. मोटारसायकलच्या मागे कुत्रे धावतात. त्यामुळे अपघात होत असतात. कुत्रे पकडण्यावर दरवर्षी 70 ते 80 लाख रुपये खर्च होतात. त्यामुळे पालिकेने प्रभावी यंत्रणा राबवावी, असं आवाहन नंदकुमार घोडले यांनी केलं आहे.

कुत्र्यांचा सुळसुळाट

बूट कितीचा, वस्तू कोणती गेली हे पाहत नाही. कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. माझ्या कॉलनीत कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक तक्रारी केल्या आहेत. पण घटना घडल्यानंतर सर्वांना जाग आली आहे, असं घोडले म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.