“जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत, त्यांनाच काही दिवसांनी लोकं जोडे मारतील”; ठाकरे गटाच्या नेत्याने शिवसेनेला इशारा दिला

गद्दारीबाबत बोलतानाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, यांनी गद्दारी केली होती. मात्र ज्या शिवाजी महाराज यांना आम्ही आदर्श मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी गद्दारी आवडत नव्हती.

जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत, त्यांनाच  काही दिवसांनी लोकं जोडे मारतील; ठाकरे गटाच्या नेत्याने शिवसेनेला इशारा दिला
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 5:05 PM

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रमाणे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे, त्याच प्रमाणे आता छोट्या मोठ्या गोष्टीवरून महाविकास आघाडीमध्येही कुरघोड्या वाढल्या आहेत. त्यामुळेच आता मविआमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबरच विरोधकांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षावरही खोचक टीका केली आहे.

त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देत असताना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी जे व्यक्तव्य त्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

त्यामुळे त्यावरून आता आणखी काही वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. तसेच खासदार संजय राऊत त्यांच्या जिभेला प्रॉब्लेम झाला होता असंही त्यांनी सांगितले.

तसेच त्यांच्या बोलण्यामुळेच संजय राऊत यांच्या विरोधात पहिल्यापासूनच इतर लोकं आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत काही वाईट बोलले नाहीत परंतु लोकांनी त्याचा गैर अर्थ काढला आहे त्यामुळे आज संजय राऊत यांच्याविरोधात लोकं आंदोलन करत आहेत.

त्यामुळे जे आज जोडे मारो आंदोलन करत आहेत त्यांनाच काही दिवसांनी लोकं जोडे मारतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

गद्दारीबाबत बोलतानाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, यांनी गद्दारी केली होती. मात्र ज्या शिवाजी महाराज यांना आम्ही आदर्श मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी गद्दारी आवडत नव्हती.

त्यांनी गद्दारांचे हात पाय तोडले, छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांना थरा दिला नाही म्हणून यांना पण थारा दिला नाही पाहिजे असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

यावेळी त्यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट हे वाचाळ वीर आमदार आहेत.यावेळी त्यांनी शिरसाठ यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, संजय शिरसाट यांना माझ्या जिल्ह्यातील जनता ज्या कमेंट करतात, त्यामुळे संजय शिरसाठ यांचे अधपतन होत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.