बायकोच नव्हे, सुनेच्याही नावावर दारुची दुकाने, शिंदेंच्या मंत्र्यावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते संदिपान भुमरे यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. संदिपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करुन वाईन शॉपचे लायसन्स घेतले, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

बायकोच नव्हे, सुनेच्याही नावावर दारुची दुकाने, शिंदेंच्या मंत्र्यावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 6:51 PM

छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून वाईन शॉपचे लायसन घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केला आहे. दत्ता गोर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी संदिपान भुमरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. याप्रकरणी आपण संदिपान भुमरे यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे रीतसर तक्रार करून लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दत्ता गोर्डे यांनी दिली. दत्ता गोर्डे हे पैठणचे माजी नगराध्यक्ष असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरे यांच्या विरोधात पुरावे सुद्धा सादर केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. “संदिपान भुमरे यांनी 2019 ते जून 2024 पर्यंत मंत्री पदावर कार्यरत होते, मंत्री पदाचा गैरवापर करून त्यांनी त्यांच्या पत्नीचे नावे दोन वाईन शॉपचे लायसन्स त्यांनी खरेदी केले. त्यांच्या सुनबाईच्या नावे तीन लायसन खरेदी करण्यात आले आहेत”, असा दावा दत्ता गोर्डे यांनी केला.

“संदिपान भुमरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून त्यांनी लायसन्स परिवारातील लोकांना मिळवून दिले आहेत. भारत सरकारचा कोड ऑफ कंडक्ट मंत्री महोदयांसाठी भारतभर लागू आहे. त्यामध्ये मंत्री पदाचा गैरवापर करून असं लायसन्स घेता येत नाही. हे सगळे लायसन्स शासनाने तात्काळ रद्द करावेत. तसेच भुमरे यांच्यावर खटला भरावा. कारण त्यांनी अँटी करप्शन अँक्ट खाली क्रिमिनल गुन्हा सुद्धा केला आहे. त्यांच्या आवेदन पत्रात त्यांचे उत्पन्न 2 कोटी असताना, त्यांच्याच आवेदन पत्रात सहा ते सात कोटींची जमीन वाईन शॉपच्या किंमतीची खरेदी दाखवली, हे पैसे यांच्या खात्यात आले कुठून? याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला भरवला गेला पाहिजे”, अशी मागणी दत्ता गोर्डे यांनी केली.

‘भुमरेंवर मनी लॉन्ड्रिंगचा मोठा खटला भरावा’

“विलास भुमरे यांचे सुद्धा उत्पन्न 54 लाख दाखवलेलं आहे. त्यांच्याही पत्नीच्या नावाने तीन-तीन वाईन शॉप घेण्यात आले आहेत. एक-एक कोटी चलन फक्त नावावर करायचं, एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये त्यांच्या परिवाराने आणले कुठून? त्यामुळे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा मोठा खटला भरावा. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले आहे. भुमरे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी”, अशीदेखील मागणी दत्ता गोर्डे यांनी केली

‘अनेक ठिकाणी त्यांच्या वाईन शॉपचे बांधकाम सुरू’

“संदिपान भुमरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. भुमरे यांनी वाईन शॉप खरेदी केल्यानंतर शिंदे सरकार आल्यानंतर वाईन शॉपला मार्केट व्हॅल्यू जास्त मिळण्यासाठी दुप्पट व्हॅट केला. सोलापूर, नेवासा अशा अनेक ठिकाणी त्यांच्या वाईन शॉपचे बांधकाम सुरू आहेत. ते लायसन आम्हाला मिळाले नसले तरी आमच्याकडे त्याची माहिती आहे”, असं दत्ता गोर्डे म्हणाले.

‘लायसन घेण्यासाठी त्यांनी पैसा आणला कुठून?’

दत्ता गोर्डे यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाचा जीआर दाखवला. “हे लायसन मिळवता येत नाही असं स्पष्टपणे लिहिलेला असताना सुद्धा कायद्याचा भंग मंत्र्यांनी केला. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेले आहे. माहितीच्या अधिकारात मागणी केली आहे. संदिपान भुमरे आणि त्यांच्या परिवाराच्या नावावर असलेल्या लायसनच्या संचिका आम्हाला मिळाव्यात. त्यांच्या सुनबाईच्या नावावर असलेल्या लायसनच्या कॉपी आमच्याकडे आहेत. त्यांनी 1 नेव्हेंबर 2021 ला लायसन खरेदी केलं आहे. सुनबाईचे उत्पन्न 2019 ला विलास भुमरेंच्या प्रतिज्ञा पत्रामध्ये निरंक दाखवण्यात आलं. मग अचानकपणे लायसन घेण्यासाठी त्यांनी पैसा आणला कुठून?”, असा सवाल दत्ता गोर्डे यांनी केला.

“मी पैठण विधानसभेचा उपजिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे पैठण विधानसभेमध्ये त्यांनी जो गैरप्रकार केला आहे, या गैरप्रकाराला वाचा फोडण्याचा काम माझच आहे. त्यामुळे आमची पक्षाची अधिकृत भूमिका आहे. आम्ही पंधरा दिवस थांबणार आहोत. लोक आयुक्तांना आम्ही तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तक्रार केली आहे. यात काही हालचाल दिसली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू”, असा इशारा दत्ता गोर्डे यांनी दिला.

“त्यांनी नियमाचा भंग केला. त्यांना पदावरून डिस्क क्वालिफाय करा. नाहीतर त्यांचे दुकान रद्द करा. त्यांनी शासनाची जरी लीगल फीस भरली असली तरी पदाचा दुरुपयोग केला आहे. ते हुकूम चुकून खासदार म्हणून निवडून आले. पैठण विधानसभेमध्ये 50 हजाराने त्यांचा पराभव आहे”, अशी टीका दत्ता पाटील गोर्डे यांनी केली.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.