‘मराठा अधिकाऱ्याला त्रास झाला तर…’; मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन काय?

मनोज जरांगे यांनी संभाजीनगरमधील सभेमध्ये बोलताना राज्य सरकार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. येत्या 20 जुलैपासून आमरण उपोषणाला सुरूवात करणार असल्याची घोषणा दिली आहे. यावेळी बोलताना मराठा अधिकाऱ्याला त्रास दिला असेल तर मराठा समाजाला पाहा काय आवाहन केलं आहे.

'मराठा अधिकाऱ्याला त्रास झाला तर...'; मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन काय?
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 9:25 PM

एखाद्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले तर तू मराठा आहे म्हणून काम करत नाही का असं धमकवायचे. त्याला काम करायचे नसले तरी काम करावं लागायचे. डॉक्टरांकडे जाणार. मराठा आहे म्हणून बील कमी करत नाही का. वकिलाकडेही जायचे. मराठ्यांचा आहे म्हणून फि जास्त घेतो का म्हणून वकिलाला बोलायचे. मराठ्यांचा मंत्री आहे म्हणून काम करत नाही का असं मंत्र्यांना म्हणायचे, पदाचा आणि जातीचा काय संबंध आहे? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

मराठ्यांना कोणी अडचणीत आलं तर बघ्याची भूमिका घेऊ नका. सर्वांनी त्याच्या मदतीला जायचं. अजिबात मागे हटायचं नाही. सपोर्ट करावा लागणार आहे. भांडण नाही करायचं. तुम्ही फक्त उभं राहा. दहशत कमी होते. तुम्ही उभे राहत नसल्याने ही दहशत वाढली आहे. कुणाच्या पायाही पडू नका. तुमच्या हातात सत्ता दिली म्हणजे तुम्ही अन्याय करणार का. मराठा अधिकाऱ्याला कुणालाही कुणी त्रास दिला तर मदतीला जायचं. नाही तर छगन भुजबळ सारख्या भंगार लोकांचं फावतं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

मी फक्त माझ्या समाजाची इज्जत करतो. बाकीच्यांची करतो. पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांची इज्जत करत नाही. एकटाच ५० ते ५५ टक्के मराठा आहे. काय गरज आहे आम्हाला कोणाची. फक्त त्यांनी आम्हाला जी वस्तू हातात घ्यायची ती घ्यायला लावू नका. मराठ्यांना त्या वळणावर जायचं नाही. त्यामुळे म्हणतो मला वेळ गरजेची आहे. मी शेवटचं टोक गाठत नाही, असं जरांगे म्हणाले.

मराठ्यांशिवाय तुमचं चालत नाही. कशाला विरोध करता. कशाला आमच्या नादी लागता. इथे चपलासकट पाया पडल्याशिवाय पर्यायच नाही. ही लय बेक्कार जात आहे मराठ्यांची. उद्या सकाळी मला गोळ्या घाला. तरीही मी तुमचा होणार नाही. तुम्ही सहा ट्रक भरून नोटा आणल्या तर मी म्हणेल विहिरीत टाक. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळीच तुम्हाला मंत्रीपद देतो तरी मी घेत नसतो, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.