उपोषणाचा निर्णय माझ्यासाठी ऐतिहासिक, संभाजीराजे म्हणतात मी फक्त कोल्हापूरपुरता नाही तर…

मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलन स्थळी दाखल होत राजेंची भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

उपोषणाचा निर्णय माझ्यासाठी ऐतिहासिक, संभाजीराजे म्हणतात मी फक्त कोल्हापूरपुरता नाही तर...
संभाजीराजेंचं उपोषण मागेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 6:26 PM

मुंबई : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मागण्यासाठी सुरू असलेले छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण (Sambhajiraje Hunger Strike) मागे घेण्यात आलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलन स्थळी दाखल होत राजेंची भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सगळ्या संघटनांचे यावेळी संभाजीराजेंनी आभार मानले आहे. मी फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, मी महाराष्ट्र आणि देशाचा आहे. शिवाजी महाराजांचे विचार जगभर परले आहेत. माझी खासदारकी लोकांच्या विकासासाठी आहे. माझ्या खासदारकीवर टीका झाली. मी आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला. त्यानंतर इतर खासदारांनीही पाठिंबा दिला. त्यांचे आभार मानतो. तसेच सर्व समाजातील लोकांचेही आभार मानतो, कारण इतर समाजातील लोकही आमच्या पाठीमागे ठाम उभे राहिले, अशी प्रतिक्रिया यावेळी राजेंनी दिली आहे.

उपोषण माझ्यासाठी ऐतिहासिक

उपोषणाबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, उपोषण हा माझ्यासाठी ऐतिहासिक निर्णय होता. मी घरच्यांना सांगितलं नव्हतं याबाबत. मी माझ्या आई-वडिलांनाही सांगितलं नाही, घरच्यांना बाहेरून कळालं. वडील असल्याने ते मला थांबवण्याची भिती होती. मी सहकाऱ्यांना त्यांचा फोन जोडून देऊ नका असे बोललो. कारण त्यांना काळजी वाटत होती. आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्यांच्याशी बोललो. त्यावेळी ते म्हणाले माझ्या आशीर्वादाची गरज नाही, तुम्हाला महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी माझ्या वडिलांचेही आभार मानतो, असेही राजे म्हणाले. राजेंनी उपोषण सोडल्याने राज्य सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू होता.

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचं नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

VIDEO: राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य, अखेर खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे

Video : माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर पोट सुटेल, उदयनराजेंचा पलटवार

गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, राज्यपाल महोदय माफी मागा! मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांचा इशारा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.