भीषण अपघात! दोन हायवात अख्खं कुटुंब चिरडलं, बाप-लेक जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांमुळे शिक्षकाचं अख्खं कुटुंबच संपवल्याची ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भीषण अपघात! दोन हायवात अख्खं कुटुंब चिरडलं, बाप-लेक जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 11:18 AM

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर: शहरात एका भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबच चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन हायवा आणि कारचा विचित्र अपघात झाला. त्यामुळे औरंगाबाद शहरात आलेलं पैठण येथील कुटुंबच उध्वस्त झालं. या अपघातात बाप-लेक जागीच ठार झाले तर महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी सायंकाळी नक्षत्रवाडी परिसरात हा भीषण अपघात झाला.

काय घडली घटना?

वडीगोद्री येथील खासगी शाळेतील शिक्षक संजय यांचे कुटुंब या विचित्र अपघातात बळी पडले. पैठण तालुक्यातील पिंपळवाडी हे कुटुंब राहते. कुटुंबातील पत्नी वर्षा यांचे संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात माहेर आहे. आई-वडील आणि भावाला भेटण्यासाठी त्या आल्या होत्या. मंगळवारी वर्षा, त्यांचे पती आणि मुलगा हे तिघे दुचाकीवरून परतीच्या प्रवासाला निघाले. पैठणच्या दिशेने जात असतानाच ही भीषण घटना घडली.

कसा झाला अपघात?

सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हे कुटुंब नक्षत्रवाडी परिसरातून दुचाकीवरून जात होते. एवढ्यात सुसाट वेगाने जाणाऱ्या हायवाने त्यांना उडवले. यात संजय यांची दुचाकी समोर अशलेल्या दुसऱ्या हायवाला घडकली. ही धडक एवढ्या वेगाने होती की दुचाकी हायवाच्या चाकाखाली गेली. संजय आणि त्यांचा समुलगा समर्थ हे चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर वर्षा लांब फेकल्या गेल्या.

हायवाने आधी कारलाही धडक दिली..

या भीषण घटनेची पोलीसात नोंद झाली आहे. वर्षा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आ हेत. निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुनसार, सदर हायवाने दुचाकीला धडक देण्यााघी महिला चालवत असलेल्या कारलाही धडक दिली. त्यामुळे त्याने खूप वेगाने विरुद्ध दिशेला हायवा वळवला. त्यातच संतोष यांची दुचाकी चाकाखाली गेली. त्यानंतर हाच हायवा समोरील हायवाला जाऊन धडकला.

परिसरात हळहळ

पैठण रोडवर वेगाने जाणाऱ्या हायवांमुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश हायवांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असतो. त्यातच वळणा-वळणाचा हा रस्ता असल्याने अपघातांच्या घटना वारंवार घडतात. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवांमुळे शिक्षकाचं अख्खं कुटुंबच संपवल्याची ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.