Sambhajiraje | संभाजीराजेंचे कोल्हापूर महापालिकेला पत्र, मोदींनी भेट नाकारल्याच्या उल्लेखाने नाराजी
मी गेल्या 14 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढ्यात सक्रीय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हा माझ्यासाठी राजकारणापलीकडील विषय आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. (Sambhajiraje letter to Kolhapur Municipal Corporation)
कोल्हापूर – राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर महापालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेची महासभा रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे हे राजकारण असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलाय. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेची महासभा रद्द करणे मी समजू शकतो, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. (Sambhajiraje letter to Kolhapur Municipal Corporation)
मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारली या कारणामुळे सभा रद्द करत असल्याचा उल्लेख करणे, हे राजकारण आहे. या प्रकारामुळे नाराज असल्याचे संभाजीराजेंनी पत्राद्वारे पालिकेला कळवले आहे. मी गेल्या 14 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढ्यात सक्रीय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हा माझ्यासाठी राजकारणापलीकडील विषय असून नक्कीच यश येणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
माझ्या आणि नरेंद्र भेटीचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने महासभा रद्द करण्याशी जोडला गेला, असे राजेंनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकट्याने जाऊन भेटता आले असते. मात्र, मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे, सर्वांना सोबत घेऊन तो लढायचा असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
कोल्हापूरमधील गॅस पाईपलाईन प्रकल्प आणि हॉकी टर्फ प्रकल्पांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून महासभेत त्या प्रकल्पांची कामे सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी होती, अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली. शहरात कोरोनाचा प्रसार वाढलाय त्यावर उपाययोजना करण्याचा निर्णय महासभेत झाला असता तर ते योग्य झाले असते.
तुमचे माझ्याविषयीचे प्रेम समजू शकतो. आपण सर्वजण मिळून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहू. मराठा आरक्षण लढ्याला नक्कीच यश येईल, असेही संभाजीराजे म्हणाले.
संबधित बातम्या:
महाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप
शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा टोला
(Sambhajiraje letter to Kolhapur Municipal Corporation)