Buldhana Bus Accident | 25 जणांचा बळी, समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील ड्रायव्हरबाबत धक्कादायक माहिती समोर

Buldhana Bus Accident | 25 जणांचा बळी गेलेल्या समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील चालकासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता.

Buldhana Bus Accident | 25 जणांचा बळी, समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील ड्रायव्हरबाबत धक्कादायक माहिती समोर
बुलढाणा बस अपघात प्रकरणी अंतिम फॉरेन्सिक अहवाल सादरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 9:25 AM

मुंबई : मागच्या आठवड्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळून बस पलटी झाली. त्यानंतर बसमध्ये भीषण आग लागली होती. यात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह आठ जणांचे प्राण वाचले होते. बसची काच फोडून बाहेर निघाल्याने या आठ जणांचे प्राण वाचले होते.

समृद्धी महामार्गावरील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात होता. कारण एकाचवेळी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांची ओळख पटवणही मुश्किल झालं होतं, इतका हा भीषण अपघात होता.

विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती

नागपूरहून पुण्याला जाणारी ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. आता या अपघातासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात 30 टक्क्याच्या वर अल्कोहोल आढळलं आहे. चालक शेख दानिश सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण त्यांना कुणीही वाचवू शकलं नाही

मध्यरात्री 1 ते 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली होती. प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हतं. तितक्यात बसने पेट घेतला. प्राण वाचवण्यसााठी प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. पण त्यांना कुणीही वाचवू शकलं नव्हतं.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.