समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावरील प्रवासासाठी किती टोल भरावा लागेल?

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एकदाच टोल भरावा लागणार, किती पैसे मोजावे लागणार?
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 2:50 PM

मुंबई : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आता लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालाय. ‘वेगवान प्रवास’ अशी ओळख निर्माण करणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Opening) आपल्या खिशाला परवडणारा आहे का? प्रवासासाठी असा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास (Samruddhi Mahamarg Toll) करणार असाल, तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? पाहुयात…

इतर महामार्गावरू प्रवास करताना अनेकदा टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी थांबावं लागतं. पण समृद्धी महामार्गावरचा प्रवास हा विना अडथळा असणार आहे. तुम्हाला एकदाच टोल भरावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही सुसाट प्रवास करू शकणार आहात. ज्या ठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्गातून बाहेर पडणार आहात तिथे Exit Point ला एकदाच टोल भरावा लागणार आहे. तो प्रतिकिलोमीटरच्या हिशोबाने असेल.

कारसाठी किती टोल?

कारने प्रवास करताना प्रतिकिलोमीटर 1 रुपया 73 या दराने पैसे द्यावे लागणार आहेत. जितके किलोमीटर अंतर तुम्ही पार केलं असेल तितकेच पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. जर तुम्ही नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरचा प्रवास कारने करणार असाल तर तुम्हाला 900 रूपये भरावे लागतील. तेच जर तुम्ही नागपूर ते मुंबई असा प्रवास करणार असाल तर 1200 रुपयांच्या आसपास खर्च करावा लागणार.

जड वाहनांसाठी किती टोल?

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 2 रुपये 79 पैसे इतका खर्च येणार आहे. बस ट्रक किंवा अन्य जड वाहनांसाठी 5 रुपये 85 प्रतिकिलोमीटर दर असेल. त्याचप्रमाणे मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 6 रुपये 38 प्रतिकिलोमीटर दर असेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.