त्यांच्याकडे आता रडत बसण्याशिवाय काम नाही – संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर

कोणाला पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवावं हा आमचा विषय आहे, विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, असे सगळे डायलॉग आता ते पाठ करत बसतील

त्यांच्याकडे आता रडत बसण्याशिवाय काम नाही - संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर
संजय शिरसाटImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 12:05 PM

भाजपाने शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपदाची ऑफर दिली असेल. भविष्यात पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल यात माझ्या मनात शंका नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते, त्यावर आता शिंदे गटाच्या नेत्यानेच पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाला पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवावं हा आमचा विषय आहे, विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, असे सगळे डायलॉग आता ते पाठ करत बसतील. करावं तसं भरावं हे आता विरोधकांच्या नशिबी आलंय. आधी बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार याची आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त चिंता लागली आहे.

आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं, ते कसं चालवायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही आता फक्त घोषणा देण्याचं काम करा, असा खोचक सल्लाही संजय शिरसाट यांनी दिला.

कुणाच्याही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत

26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होणार होतं, पण आता ती तारीख उलटून गेली आहे तरीही सरकार स्थापना झालेली नाही. त्यांच्या तंगड्यात तंगड्या अडकल्या आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती. मात्र ते आरोप संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे फेटाळले आहेत. असं काहीहीह नाही, आमच्या कुठेही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंव एकनाथ शिंदे, सर्व नेते निवांत आहेत. सरकार व्यवस्थितपणे स्थापन होईल, तुम्हाला 2-4 दिवसांत दिसून येईल. त्यांचा शपथविधी मोठ्या प्रमाणात होईल, अस शिरसाट यांनी सांगितलं.

लोकांना तुमचा चेहरा पहायचीही इच्छा नाही

भाजपचा शब्द गांभीर्याने घेऊ नये, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. कोट्यवधी लोकांनी विश्वास ठेवला, भाजप असो की शिवसेना मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेत ना. काहीतरी कारण असेल ना. संजय राऊत फक्त जनतेला गृहीत धरू शकतो. जनता मूर्ख आहे असं समजून जे तुम्ही राजकारण करत होता ना, जनतेने तुम्हाला ( विरोधकांना) तुमची जागा दाखवली आहे. तुम्हाला जो अहंकार होता ना, आमचा चेहरा घेऊन चाला, ही भाषा होती ना तुमची, आता हे चेहरे पहायचीसुद्धा लोकांची इच्छा नाही त्यामुळे लोकांनी तुमच्याविरोधात मतं दिली. तुमचा चेहरा तुम्हीच आता आरशात पहा आणि ठरवा कोणाचा चांगला आहे ते असा टोमणा शिरसाट यांनी लगावला.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.