Parbhani : वाळू माफियांनी केली युवकाची हत्या; महसूल विभागाकडून अजून चौकशीच सुरू
अवैध वाळू उपसा (Illegal sand extraction) रोखणाऱ्या युवकाचा वाळू माफियांकडून (Sand mafias) खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथे 24 मार्च रोजी घडली होती. मात्र पोलिसांकडून काल गुन्हा नोंद करण्यात आलाय.
अवैध वाळू उपसा (Illegal sand extraction) रोखणाऱ्या युवकाचा वाळू माफियांकडून (Sand mafias) खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथे 24 मार्च रोजी घडली होती. मात्र पोलिसांकडून काल गुन्हा नोंद करण्यात आलाय. माधव त्र्यंबक शिंदे असे मृताचे नाव आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर पोलीस हरकतीत आली असून, गंगाखेड ठाण्यात आठ जणांविरोधात 302 सहित विविध कलमांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस पुढील तपास करत असून पोलीस प्रशासनाने विविध पथके तयार करत आरोपींचा शोध सुरू केलाय. दुसरीकडे महसूल विभागाकडूनही संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Latest Videos