MNS BJP: रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून दिलेला हिंदुत्वाचा नारा, त्यानंतर केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अचानक त्यांची भेट घेणं. गडकरींपाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

MNS BJP: रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार?
रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 3:55 PM

समीर भिसे, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून दिलेला हिंदुत्वाचा नारा, त्यानंतर केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अचानक त्यांची भेट घेणं. गडकरींपाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  (Raosaheb Danve) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या राज ठाकरे यांचा बदललेला सूर आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे मनसे (mns) आणि भाजपची युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच रावसाहेब दानवे यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सांगितलं. एवढं कमी होतं की काय, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही दानवेंच्या सुरात सूर मिसळून राजकारणात काहीही होऊ शकतं असं सांगून या चर्चांना हवा दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, त्या राजकारणात घडल्या. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं. काळाच्या पोटात काय दडलंय हे आताच सांगता येत नाही. राजकारण्यांना परिस्थिती नुसार बदलावं लागतं. राज ठाकरेंनी भूमिका बदलली त्यांचा विचार नक्कीच होईल. मात्र राज ठाकरे भूमिका बदलतील का माहीत नाही. मनसे भाजप युती होईल का हेही माहीत नाही. काळाच्या पोटात काय दडलं हे सांगता येत नाही. एकत्र येईलच हे सांगता येत नाही. पण भूमिका बदलावी लागले. भूमिका बदलली तर काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.

सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्द्यावरून संगमा, तारिक अन्वर, पवार यांनी काँग्रेसमधून सोडली होती. पण तेच काँग्रेसशी युती करून सरकारमध्ये आहेत. बदलली ना भूमिका. बदलावी लागली ना, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतील हे वाटलं होतं का? पण आले. तिकडे उत्तर प्रदेशात बसपा नेत्या मायावती आणि अखिलेश एकत्रं येतील असं वाटलं होतं का? पण आले एकत्र. नितीश कुमार आणि लालू प्रसादही एकत्र आले. राजकारणात परिस्थिती नुसार बदलावं लागतं. त्यामुळे उद्या काहीही होऊ शकतं, असंही ते म्हणाले.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया ताजी असतानाच संदीप देशपांडे यांनीही त्यांची री ओढली आहे. युती बाबतचा निर्णय हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. राजकारणात काहीही होऊ शकतं. उद्या काय होणार हे राजकारणात आज काही सांगू शकत नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Raosaheb Danve: राज ठाकरेंनी मला पेढे दिले, मी त्यांना रेल्वेचं इंजिन गिफ्ट दिलं; रावसाहेब दानवेंना नेमकं सांगायचंय काय?

Raosaheb Danve: शिवसेनेने दिवसाढवळ्या बगावत केली, सत्ता गेल्याचं नाही, धोका दिल्याचं दु:ख; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : नितीन गडकरींनी पाठोपाठ रावसाहेब दानवेही राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चा तर युतीचीच होणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.