बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना आता एक नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्याच्या तैलिक महासभेच्या युवा अध्यक्षपदाची धुरा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर दिली गेली आहे. (Sandip Kshirsagar elected as chairman of Tailik Mahasabha)
संदीप क्षीरसागर हे तैलीक समाजाचे नेतृत्व करणारे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजप खा. रामदास तडस यांच्या उपस्थितीत आमदार क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड कार्यक्रमाकडे मात्र संदीप यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठ फिरवली.
तैलिक समाज संघटन मोठं आहे. देशाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आहेत. देशातील सर्वपक्षीय नेते या महासभेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कार्य म्हणावे तसे चालत नसल्याची नाराजी राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एका बैठकीत व्यक्त केली होती. त्यानुसार पुणे येथे 27 डिसेंबर रोजी तैलिक महासभेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना राज्याच्या युवा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. तैलीक महासभेचे क्षीरसागर हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
या पुढील काळात समाजबांधवांना सोबत घेऊन राज्यभर समाजाचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, अशी प्रतिक्रिया अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी दिली.
काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांचा राजकीय वाद साऱ्या राज्याला माहिती आहे. तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जयदत्त क्षीरसागर हे काम पाहतात. मात्र पुणे येथील आयोजित तैलीक महासभेच्या बैठकीला जयदत्त क्षीरसागर यांनी पाठ फिरविली. तैलिक समाजाने सर्वानुमते संदीप क्षीरसागर यांची निवड केली असली तरी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले काका जयदत्त क्षीरसागर मात्र कार्यक्रमाला दांडी मारल्याने काका- पुतन्याचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. क
दरम्यान, कट्टर राजकीय वैरी असलेले क्षीरसागर काका- पुतणे आता एकाच संघटनेत मोठ्या पदाची धुरा सांभाळत असले तरी या दोघांत येणाऱ्या काळात सामाजिक गोडवा येईल का हेच पाहावे लागेल.
(Sandip Kshirsagar elected as chairman of Tailik Mahasabha)
हे ही वाचा
कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय: संजय राऊत
Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर