नाराजी, खदखद अन् उमेदवारी…; विशाल पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह
Congress Vishal Patil on Sangali Loksabha Election 2024 : सांगली लोकसभेत कोण उमेदवार असणार?, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशात विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. तसंच या ठिकाणाहून काँग्रेसच लढेल, असं ते म्हणाले.
देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महाराष्ट्रात विविध घडामोडी घडत आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत तेढ असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचं प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसच लढवणार, असं स्थानिक काँग्रेस नेते म्हणत आहेत. काँग्रेसचे नेते आणिं सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणारे विशाल पाटील हे पत्रकार परिषद घेत आहेत. सांगलीची जागा लढण्यावर ठाम असल्याचं विशाल पाटील म्हणालेत.
विशाल पाटील यांची भूमिका काय?
विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस एकसंघ काम करतोय. कॉंग्रेस पक्षच सांगली लोकसभेची जागा लढवेल असा निर्णय घेतला होता. सर्वांचं एकमत होऊन सांगलीतून उमेदवारी मिळावी म्हणून माझं नाव दिल्लीला पाठवलं गेलं. पण हा जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे पुढे आला, असं विशाल पाटील म्हणाले.
आम्ही कॉंग्रेस नेते यांनी कुठेही आक्रमक वक्तव्य केली नाहीत. संजय राऊत माध्यमासमोर येऊन भाजप विरोधात बोलतायेत. हे आम्हाला ही ऊर्जा देणारी बाब आहे. वसंतदादांनी त्या काळी शिवसेनाला मदत केली होती. आता आम्ही या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छूक आहोत. काँग्रेसचा उमेदवारच सांगलीतून लढेल. कारण सांगलीच्या घराघरात काँग्रेस आहे, असं विशाल पाटलांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
मागच्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर संजय विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत पुरोगामी चळवळीचा आवाज आहे. मात्र राऊत याचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जातोय. विश्वजीत कदम यांच्यावर संशयास्पद बोलणं चुकीचं होतं, असं विशाल पाटील म्हणालेत.
आपल्याच मविआमधील नेत्यांवर संजय राऊत यांनी बोलने हे दुर्दैवी आहे. सांगलीचा विषय हा बंद खोलीत चालला पाहिजे होता. पण तसं झालं नाही. संजय राऊत याचा सांगली दौऱ्यामागचे कारण काय? राऊत यांनी संगलीचा दौरा केल्यावर त्यांना जिल्ह्यातील परिस्थिती कळली असेल. त्यामुळे उद्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.