मोदींच्या कामाचं कौतुक अन् विरोधकांवर निशाणा; सांगलीत देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा; म्हणाले…
Devendra Fadnavis on Narendra Modi and Loksabha Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीत सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीतील कडेगावमध्ये सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशाच्या लोकसभेची ही निवडणूक आहे. कोण देशाचा विचार करेल, देश पुढे नेऊ शकेल याची निवडणूक आहे. या निवडणूक दोन तीन उमेदवार आहेत. यामध्ये आपल्याला एकच उमेदवार नरेंद मोदीचे उमेदवार तर दुसरीकडे राहुल गांधीचे उमेदवार आहेत. राहुल गांधीच्या इंजिनमधील बोगीमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधी बसू शकतात. शरद पवार यांच्या बोगी मध्ये सुप्रिया सुळे बसू शकतात आणि उद्धव ठाकरेच्या बोगीत फक्त आदित्य ठाकरेंच बसू शकतात. सर्वसामान्यना प्रवेश नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.
इंडिया आघाडीवर निशाणा
यंदाची ही निवडणूक 2 व्यक्तिमत्वाची आहे. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात आहे. तिकडे राहुल गांधी यांच्या 26 पक्षाची खिचडी आहे. आपली इंजिन सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास करणारे आहेत. कारण इंडीया आघाडीतील सगळेच स्वत:ला इंजिन समजतात.आम्ही पूर्ण ताकतीने संग्राम आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठिशी आहे. आज आहे. उद्या पण आहे. ही नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिका, विधानसभा निवडणुक नाही, लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मी मुख्यमंत्री झाल्यावर फक्त विदर्भला जास्त पैसा जाईल असा आरोप करण्यात आला. पण मी मुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रमधील अनेक योजनांना सर्वाधिक निधी देत योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी सिंचन योजनेला नरेंद्र मोदी यांनी निधी दिला. त्यामुळे आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. अनेक लोकांनी राज्य केले सत्ता भोगली. पण आपल्याला फक्त चॉकलेट दिले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मोदींच्या कामाचं कौतुक
नरेंद्र मोदींनी ऊसातील आणि साखर कारखानादारीतील काय कळतं, हा प्रश्न उपस्थित केला. पण त्यांच्या कारकिर्दीत काय केले, हे विचारले पाहिजे. मोदींनी साखर कारखान्याना वेगवेगळ्या माध्यमातून मोठी मदत करून साखर कारखानादारी वाचवली. 80 लाख आज बचत गट तयार करून महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.