विद्यार्थी रडतायेत, ‘गुरुजी तुम्ही जाऊ नका’, पालकांचे सुध्दा डोळे पाणावले

गुरुजींची बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे डोळे पाणावल्याचं चित्र सांगली जिल्ह्यात पाहायला मिळालं. त्यामुळे शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमावर व मायेवर असते ते या घटनेने दिसून आले आहे.

विद्यार्थी रडतायेत, 'गुरुजी तुम्ही जाऊ नका', पालकांचे सुध्दा डोळे पाणावले
Teacher dilip waghmareImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 11:09 AM

सांगली : सांगलीच्या जत (Sangali jat) तालुक्यातील पांडोझरी-बाबरवस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे (Teacher dilip waghmare) यांची आंतरजिल्हा बदली झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक भावूक झाल्यामुळे याची सगळीकडे चर्चा आहे. गुरुजींच्या भोवती मुलं फिरत होती, ‘गुरुजी तुम्ही जाऊ नका.’ त्याचबरोबर विनवण्या सुध्दा करीत होती. हे सगळं पाहून पालकांचे डोळे पाणावले. शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमावर व मायेवर असते ते या घटनेने दिसून आलं आहे. अनेकदा शिक्षकाची (education news) बदली झाल्यानंतर अशा पद्धतीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मुलाचं शिक्षकाप्रती असलेलं प्रेम खूप काही सांगून जातं.

जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे

जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे

जत पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून २०११ पासून शिक्षक म्हणून काम करत होते. तेथे काम करत असताना त्यांनी सह-शालेय उपक्रम, पालक भेटी,शैक्षणिक उठाव उपक्रम, पालक संपर्क, शैक्षणिक जागृती असे उपक्रम राबवले व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा चांगलाचं उंचावला. त्यांनी चांगलं काम केल्यामुळे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे. त्यांनी मुलांना शिक्षण देत असताना अधिक जीव लावल्यामुळे मुलं रडली.

हे सुद्धा वाचा
the magestic

वस्तीवरील ४० कुंटुंबे व्यसन मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे.

वस्तीवरील ४० कुंटुंबे व्यसन मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. ज्ञानरचनावाद, बोलक्या भिंती, वृक्ष लागवड व संगोपन हे उपक्रम ही त्यांनी तिथं राबविले आहेत. अशा या धडपडी व उपक्रमशील दिलीप वाघमारे गुरुजी यांची नांदेडला बदली झाली. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ अतिशय भावूक झाले होते. मुलांच्या मनात गुरुजींच्या बद्दल आदर प्रेम भावना असल्याने निरोपावेळी सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता

निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.