जयंत पाटलांचं नाव घेण्याइतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही!; राजू शेट्टी भडकले

Raju Shetti on Jayant Patil and Sugarcane Rate : सरकारने लवकरात लवकर ऊसदराचा तिढा सोडवावा, नाहीतर...; राजू शेट्टी यांचा सरकारला थेट इशारा... राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही राजू शेट्टी यांची कठोर शब्दात टीका... नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी? वाचा सविस्तर...

जयंत पाटलांचं नाव घेण्याइतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही!; राजू शेट्टी भडकले
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 3:07 PM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, सांगली | 10 डिसेंबर 2023 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसदरावरून आक्रमक झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार राज्य सरकारने बघायची भूमिका घेऊ नये लवकरात लवकर ऊसदराचा तिढा सोडवा. जर तसा निर्णय झाला नाही. तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही कठोर शब्दात टीका केली आहे.

जयंत पाटलांवर टीका

जयंत पाटील यांचं नाव घेण्याची वाईट वेळ माझ्यावर अजून आलेली नाही. आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे जयंत पाटील यांनी बघावं. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी लढतोय. त्यांच्यासाठी टाहो फोडतोय, असं म्हणत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

ऊसदरावर काय म्हणाले राजू शेट्टी?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वसंतदादा साखर कारखाना प्रणित दत्त इंडिया इथं जात काटा बंद आंदोलन करत आहेत. सध्या या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. इथं टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अद्याप कायम आहे. ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्या समोर काटा बंद आंदोलन करण्यात येतंय. ऊस दराबाबत कोल्हापूर पॅटर्न सांगली जिल्ह्यात ही सर्व साखर कारखान्यांनी राबवावा, अशी प्रमुख मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

स्वाभिमानीचं आंदोलन

ऊस दरावरून सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. हे कार्यकर्ते सर्व वसंतदादा साखर कारखान्याच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यांच्या जोरदार बाचाबाची सुरू आहे. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.ऊसाला योग्य भाव मिळत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.