सांगली-कोल्हापूर 5-6 दिवसात चकाचक करण्याचे आदेश : गिरीश महाजन

शेकडो वर्षात झाला नाही इतका पाऊस यंदा काही दिवसात पडला. त्यामुळे नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे, असं गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.

सांगली-कोल्हापूर 5-6 दिवसात चकाचक करण्याचे आदेश : गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Aug 12, 2019 | 3:31 PM

सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थितीची माहिती दिली. “शेकडो वर्षात झाला नाही इतका पाऊस यंदा काही दिवसात पडला. त्यामुळे नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे”, असं गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.

मनुष्यबळ कितीही लागूदे, गावं 5-6 दिवसात चकाचक झाली पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सध्या आमचं लक्ष्य आरोग्य यंत्रणेकडे आहे. पुरामुळे घाण रस्त्यावर आली आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि औषधांची तयारी राज्य सरकारने केली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये सर्वकाही पूर्वपदावर आणू असं गिरीश महाजन म्हणाले.

पुरात नुकसान झालेल्या घरांच्या सर्वेक्षणासाठी तलाठ्यांना पाचारण करणार. वीज-आरोग्य आणि पाणी यासारख्या सुविधा देण्यास प्राधान्य आहे. युद्धपातळीवर काम सुरु आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

सांगलीमध्ये पाणीपातळी 57.5 इंचांवर गेली होती, सध्या 50.5 इंचांवर आहे, 40 फुटापर्यंत इशारा पातळी आहे. दोन दिवसांत पूर ओसरुन पूर्ववत होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 

नाल्यावर बांधकाम असतील तर विषय गंभीर आहे. त्याची चौकशी करु.

धामणी-अंकली गावात कुणी गेले की नाही अशी माहिती अजूनपर्यंत नाही.  लोकांना आणि प्रशासनाला याची कल्पना नव्हती. गाफिल अधिकाऱ्यांवर  2-3 दिवसात कारवाई करण्यात येईल. या विषयावर राजकारण करु नका. सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल. यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.

निवडणूक आयोगाला वाटलं तर निवडणूक पुढे घेऊ शकतात.

सर्वात जास्त काळजी आरोग्याची घेणार. फवारणीचे औषध आमच्याकडे आलेले आहे

कर्ज घेऊन नदीजोड प्रकल्प राबवायचा आहे-महाजन

आपणही आम्हाला मदत करा मिडियाला महाजनांचे आव्हान

जलसंपदा विभागाकडून माण खटावच्या सिंचनाच्या योजनांना निधी दिला

दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न

1500 कोटी रुपये लोन पाणी योजनासाठी घेतलं

5 वर्षात 50 हजार कोटींची मदत करणार

मी आमच्या गेस्ट हाऊसला थांबलो होतो

मी संघाच्या स्वयंसेवकाकडे जेवायला गेलो

मला वाटतं सोशल मिडियावर लक्ष देवू नका

सर्व आमदारांना विनंती करणार सर्व शासकिय,निमशासकिय कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन करणार

वरच्या भागात घरे बांधण्यासाठी dpr तयार करणार

7 दिवसात गाव पूर्ववत करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पावसाने उच्चांक केल्यामुळे पूरपरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती आहे.

सगळ्या प्रकारची लोकांकडून मदत होतेय.

संकटात सापडलेल्या जिल्ह्यांना गणेश मंडळांनी खर्चात काटकसर करुन मदत करण्याचे आवाहन

कोल्हापूरमध्ये लावलेल्या कलम 144 बद्दल मला माहिती नाही, माहिती घेवून बोलेन

अतिक्रमणात घरे बांधली जात आहेत. ती बांधली जाऊ नयेत

ही परिस्थिती सर्वच शहरात. या संदर्भात कडक निर्णय घेणार

शहरी भागासाठी 15 हजार आणि ग्रामिण भागासाठी 10 हजार रुपये मदत. ही मदत तात्परुत्या स्वरुपाची आहे.

बीएसएनलची सेवा सुरु झाली आहे. बँक अधिकाऱ्यांशी चर्चा झाली,तात्काळ सेवा सरु करण्याच्या सूचना दिल्या.

पैसे उपलब्ध करुन देण्याचे आदेश

पैसे देण्याचा gr काढला, जेव्हापासून पाणी आलं तेव्हापासून पैसे देणार

अशी कुठेही माहिती नाही की गोठ्यात 70 जनावरे मरुन पडले

आमच्या कानावर आलं नाही. अर्ध्या तासात माहिती घेऊन विल्हेवाट लावू

डाँक्टरांची कुमक मागवली आहे. सर्व प्रकारची काळजी घेत आहोत

मिरजला पाणी पुरवठा सुरु. सांगलीत स्वच्छता करुन परवापर्यंत पाणीपुरवठा सुरु करु

बाहेरच्या महापालिकेच्या यंत्रणा मागवल्या.

मेलले जनावरांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना.

गाळ उपसण्याची सुरुवात करायची आहे

घरांचा सर्वे लवकर व्हावा यासाठी तलाठ्यांना पाचारण,  कामाला सुरुवात

एका आठवड्यात जनजीवन सुरुळीत होईल

पाणी पुरवठ्याच्या योजना सुरु करण्यावर भर

मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत

मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशींचा या मध्ये अनुभव मोठा आहे. त्यांची देखील मदत घेतली जाईल.

युद्धपातळीवर उपापयोजना केल्या जातील.

प्रौढांसाठी 60 रुपये लहान मुलांसाठी 45 रुपये मदत

10 किलो गहु आणि तांदुळ देणार

जनावारांचा आकड्याचे सर्वे सुरु

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.