Bharat Bandh | सांगलीत काँग्रेसकडून केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट

भारत बंद दरम्यान, काँग्रेसकडून केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली.

Bharat Bandh | सांगलीत काँग्रेसकडून केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 3:22 PM

सांगली : सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट आणि धक्का बुक्की झाली आहे (Struggle Between Congress Activists And Sangli Police). भारत बंद दरम्यान, काँग्रेसकडून केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत होते (Struggle Between Congress Activists And Sangli Police).

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसच्या वतीने सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली. धक्का बुक्कीही झाली.

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी

एकीकडे कृषी विधेयकाच्या विरोधात भारत बंद आंदोलन सुरु आहे. तर बंद आंदोलनाच्या विरोधात भाजप नेते कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचले आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विधेयकाची माहिती देत आहेत. भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे आणि कार्यकर्त्यांनी रोडवरील शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली (Struggle Between Congress Activists And Sangli Police).

कृषी कायद्याच्या विरोधात सांगली बंद

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज सांगली बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सांगली बंदची हाक दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून  मोटर सायकल रॅली काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोटर सायकल रॅली अडवली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांन मध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर मोटर सायकल रस्त्यावर उभी करुन आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केलं.

त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅली सुरु केली. सांगली शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, जो कोमी बंद मध्ये सहभागी झाले नाहीत, जी दुकानं सुरु आहेत, त्या दुकानदारांना लाल मिर्ची भेट देऊन या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत आंदोलन केलं.

Struggle Between Congress Activists And Sangli Police

संबंधित बातम्या :

Delhi Farmer Protest | कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

जेव्हा व्यापाऱ्यांवर वेळ येईल, तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवू, अंकुश काकडेंचा संताप

BHARAT BAND | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत! दिल्लीतील आजची स्थिती काय?

BHARAT BAND | संप यशस्वी झाला, फेल झाला की संमिश्र राहीला?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.