सरपंचाचं प्रकरण उजेडात आलं, जिल्हाधिकाऱ्यांनी पद रद्द केलं, मग….

मिरज तालुक्यातील जानराववाडीचे लोक नियुक्त सरपंच भरत कुंडले यांचे पद रद्द करण्यात आले आहे. शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे आली होती. त्यानंतर त्यांनी कशी कारवाई केली पाहा.

सरपंचाचं प्रकरण उजेडात आलं, जिल्हाधिकाऱ्यांनी पद रद्द केलं, मग....
sangli collector officeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 10:18 AM

सांगली : मिरज (MIRAJ) तालुक्यातील जानराववाडी (JANRAOWADI) येथील लोकनियुक्त सरपंच व दुय्यम बाजार समिती मिरजचे माजी सभापती भारत हिम्मत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या (MAHARASHTRA GOVERNMENT) सुमारे पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बाग (GRAPES CULTIVATION) केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कुंडले यांचे सरपंच पद रद्द केले आहे. त्यामुळे मिरज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात हा सगळीकडं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर अनेक सरपंच सुध्दा जागृत झाले आहे.

अशी केली कारवाई

जानराववाडी ग्रामपंचायत निवडणूक 18 डिसेंबर २०२२ रोजी झाली होती. त्यामध्ये भारत कुंडले हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून 64 बेघरांना देण्यात आलेल्या जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार संभाजी साळुंखे, सुनील बिसुरे, श्रेयसराव कुंडले यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली होती. त्यानुसार भारत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बागेसह इतर पिके लावल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी भारत कुंडले यांचे सरपंच पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. भारत कुंडले यांचे सरपंच पद रद्द झाल्याने अनेक शासकिय जागांवर अतिक्रमण केलेल्या सदस्यांचे पद रद्द होण्याची टांगती तलवार राहिली आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांनी सुध्दा कौतुक केलं

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर तिथल्या लोकांनी सुध्दा कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आपल्या पदाचा कोणी अशा पद्धतीने कोणी वापर करणार असेल तर अशा पद्धतीची कारवाई व्हायला हवी अशी देखील मिरज तालुक्यात सगळीकडे चर्चा आहे. कारवाई करण्यात आलेल्या सरपंचांनी जमीन हडपल्यानंतर तिथं द्राक्षांची काही रोप लावली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.