देखण्या घोड्यांची रुबाबदार ऐट; एकापेक्षा एक बलाढ्य घोड्यांची रंगली स्पर्धा
कोरोना काळानंतर सांगलीमध्ये पाहिल्यांदाच घोडे मैदान घेतले गेले आहे. यामध्ये साधारण 21 घोडे सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी कर्नाटक, सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून घोडे सहभागी झाले होते.
सांगली : रूबाबदार, देखणे आणि बलाढ्य, देखणे असे घोडे सांगलीकरांना पाहता आले. घोड्याच्या अनोख्या स्पर्धा आज सांगलीत रंगल्या होत्या. या स्पर्धेत स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि स्वर्गीय बिजली मल्ल पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि स्वर्गीय बिजली मल्ल पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धेत अनेक रूबाबदार असे घोडे सहभागी झाले होते. जातिवंत घोड्यांचे आणि घोड्यांच्या चालीचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आल्याने सांगलीकरांनी त्याचा आस्वाद घेतला.
या प्रदर्शनामध्ये तब्बल 21 घोड्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी घोडेस्वारांनी घोड्यांच्या माध्यमातून आपली कला सादर केली.ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेत रुबाबदार, देखण्या, घोड्यानी सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडली. प्रत्येक घोड्यांनी चांगले प्रदर्शन दाखवले होते. आणि त्यातून या स्पर्धेतील विजेतेही घोषित करण्यात आले होते.
कोरोना काळानंतर सांगलीमध्ये पाहिल्यांदाच घोडे मैदान घेतले गेले आहे. यामध्ये साधारण 21 घोडे सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी कर्नाटक, सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून घोडे सहभागी झाले होते.
या स्पर्धेत घोड्यांच्या दोन प्रकारच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. घोड्यांची भरदस्त चाल असते ज्याला नडगे म्हणतात किंवा कदम चाल म्हणतात, ती पण स्पर्धा होती. आणि दुसरं घोड्याला 64 खोडी असतात असं म्हटले जाते.
म्हणजे एखादा घोडा पाण्याला बघून थांबतो, एखादा घोडा काठीला बघून थांबतो, एखादा घोडा कलर बघून थांबतो. तर ह्या 64 खोडी किंवा 64 कला या घोड्याच्या ज्या आहेत. या सगळ्याची कलांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
या घोड्याच्या पिढीत आमची चौथी पिढी आहे. आमच्या आजोबा पणजोबापासून आम्ही घोडी पाळतो. सांगलीतमध्ये असलं पहिले मैदान झाले आहे. आज या पहिल्या मैदानात माझा प्रथम क्रमांकचा घोडा आलेला आहे आणि मी याच्याबद्दल खूप मनःपूर्वक धन्यवाद देतो असं मोसिन राजू मुजावर यांनी सांगितले.