Sangli Lockdown | सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
सांगलीत बुधवार 22 जुलै रात्री 10 वाजल्यापासून गुरुवार 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असेल.
सांगली : सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात 22 जुलैपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. (Sangli Lockdown Guardian Minister Jayant Patil announces)
सांगलीत बुधवार 22 जुलै रात्री 10 वाजल्यापासून गुरुवार 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असेल. सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला. सांगलीतील गर्दी कमी न झाल्यास लॉकडाऊन करणार, असा इशारा आधीच जयंत पाटील यांनी दिला होता.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजीत कदम, विद्यमान आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : चाकरमान्यांना खुशखबर, गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता
गेल्या आठवड्यात सांगली महापालिका क्षेत्रात 195, तर उर्वरित ग्रामीण भागात 123 कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजाराच्या वर गेल्याने धास्ती वाढली आहे.
सांगली जिल्ह्यात इस्लामपूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 23 मार्चला आढळला होता. सौदी अरेबियाहून आलेल्या चार व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर या भागात कोरोनाचा विळखा वाढत गेला.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
एकाच कुटुंबात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. परंतु त्यानंतर रुग्णवाढीचा वेग मंदावल्याने काहीसा दिलासा मिळत होता. मात्र नियम शिथिल होताच कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसली.
VIDEO : Kolhapur Lockdown | कोल्हापुरात 7 दिवस कडक लॉकडाऊनhttps://t.co/Bl3itknAxG
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
संबंधित बातम्या :
जिल्हाधिकाऱ्यांचे फेरआदेश, कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनच्या नियमात बदल
“डॉनला कोरोनाने पकडलंय, घरात थांबा, उगाच डॉन बनू नका”, नगरपालिकेची अनोखी जाहिरात
(Sangli Lockdown Guardian Minister Jayant Patil announces)