सांगलीतील मिरज जातीय दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता
सांगलीतील मिरज जातीय दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता
सांगली : मिरज येथे 2009 साली घडलेल्या जातीय दंगलीप्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आघाडी सरकारने या दंगलीप्रकरणातील खटले काढून टाकण्याबाबत न्यायालयालात अर्ज केला होता.
2009 मध्ये गणेशोत्सवादरम्यान घडली होती जतीय दंगल
जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. 2009 मध्ये गणेश उत्सवादरम्यान ही जातीय दंगल घडली होती.
दंगल भडकल्यामुळे पोलिसांनी केली होती कारवाई ?
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 2009 साली गणोशोत्सवादरम्यान जातीय दंगली उसळल्या होत्या. अफझलखानाच्या वधाचे पोस्टर फाडल्यावरुन ही दंगल उसळली होती. या दंगलीनंतर पोलिसांनी विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी दगडफेक, जळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच चिथावणीखोर भाषण देणे या गुन्ह्यांखाली कारवाई केली होती. या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. आजच्या निकालात न्यायालयाने एकूण 106 जणांची निर्दोष मुक्तता केली.
नेमकं प्रकरण काय आहे ?
खटला बरखास्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून अर्ज
इतर बातम्या :
महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगली, नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखपदी
(sangli miraj 2009 communal riot case all 106 accused acquitted by district court)
Sai Lokur : हनिमुनिंग इन मालदीव, सई लोकूर आणि तिर्थदीप रॉयचे व्हेकेशन फोटोhttps://t.co/oTAyq2yYrO#SaiLokur #Vacation
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2021