70 हजारांचा बैल गावात आणला अन् थरार घडला, एक बैल,4 मगरी, किस्सा चर्चेत

गावातल्या पोरांनी पकडायचा प्रयत्न केला तर हे बैलोबा थेट नदीपात्रातच पडले. किस्सा इथेच संपत नाही, इथून पुढेच थरार सुरु झाला.

70 हजारांचा बैल गावात आणला अन् थरार घडला, एक बैल,4 मगरी, किस्सा चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 12:31 PM

शंकर देवकुळे,सांगली : सांगलीतल्या (Sangli) भिलवडी गावात एका बैलानं नुकतीच एंट्री मारली अन् मोठा विचित्र किस्सा घडला. चांगला देशी वाणाचा बैल तब्बल ७० हजारात खरेदी केला म्हणून शेतकरी कुटुंब खुशीत होतं. मोठ्या उत्साहानं गावात आणलं. गाडीतून उतरत असताना हे जनावर थोडं सैरभैर झालं. नवं गाव पाहून गोंधळलेलं होतं. त्यातच एका ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून पार घाबरलं अन् सैरावैरा पळायला लागलं. थेट नदीकाठ गाठला. गावातल्या पोरांनी पकडायचा प्रयत्न केला तर हे बैलोबा थेट नदीपात्रातच पडले. किस्सा इथेच संपत नाही, इथून पुढेच थरार सुरु झाला. नदीतल्या 4 मगरींच्या जाळ्यात बैल सापडला..

काय घडलं नेमकं?

भिलवडीतील साठेनगरमधील अक्षय मोरे यांचा हा बैल. आटपाडी येथील बाजारातून तब्बल 70 हजार रुपयांत त्यांनी हा देशी बैल खरेदी केला. गावात मोठ्या उत्साहानं बैलाला आणलं गेलं. टेम्पोतून त्याला गावात आणलं. मात्र गाडीतून खाली उतरत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून तो गोंधळला. अन् थेट पळत सुटला. तो नदी काठाला पळाला. यावेळी युवकांनी त्याला पकडण्यासाठी दोरीचा फास केला. मात्र तो फास चुकवून बैल हा नदीपात्रात पडला. बैल हा दुष्काळी भागातील असल्याने नदीचे पाणी पाहून तो सैरभैर झाला. नवीन नदीत गोंधळून गेला. अखेर पोहत पोहत तो पैलतीरावर अंकलखोपच्या दिशेने चालला. याच दरम्यान नदीपात्रात तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला. बैल मगरींना चकवा देत होता अन् काठाच्या दिशेने पोहत निघाला. अखेर एक पैलतीर गाठलं, पण त्याच्या भोवती मगरी फिरतच होत्या. नव्या बैलाला असं मगरींनी घेरलेलं पाहून गावकरी प्रचंड घाबरले. अखेर इथल्या युवकांनी मदतीसाठी स्थानिक नावाडी नितीन गुरव यांना बोलावलं. नितीन गुरव तात्काळ घटनास्थळी आले. काही तरुणांना त्यांनी सोबत घेतलं. एक तराफा घेतला आणि मगरींच्या जाळ्यातून बैलाची सुखरुप सुटका केली. तब्बल चार तास चाललेला हा थरार कृष्णा काठच्या गावकऱ्यांनी डोळ्यात प्राण आणून अनुभवला.

भिलवडीत घडलेला हा थरारक किस्सा सध्या सांगलीत तुफान चर्चेत आहे. स्थानिक नावाडी नितीन गुरव यांनी तत्काळ मदत केली, त्यामुळे बैलाचा जीव वाचला. शेतकरी अक्षय मोरे यांनी गुरव यांचे आभार मानले.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.