170 विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा, 24 तासात अहवाल मागितल्यामुळे प्रशासन…

Food Poisoning : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त संतप्त झाले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

170 विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा, 24 तासात अहवाल मागितल्यामुळे प्रशासन...
Sangali poison studentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 8:41 AM

सांगली : आश्रमशाळेतील (Ashram School) जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी (Umadi Residential School) येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून. विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण (sangali News) चौकशीकरून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले

जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या शाळेचं नाव समता आश्रम असं आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ सुरु झाली. अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले होते. मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.

प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली

१७० विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत, त्याचबरोबर त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाकीचे विद्यार्थी रुग्ण मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना

ही घटना झाल्याचं समजल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य यंत्रणेने पाऊलं उचलल्याने इतक्या मोठया संख्येने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर योग्य वेळेत उपचार करण्यात आले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचे वय साधारण पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.